मुंबई

५२ लाखांचा अपहार करुन फसवणूक

CD

५२ लाखांचा अपहार करून फसवणूक
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
अंधेरी, ता. २४ (बातमीदार) : सुमारे ५२ लाखांच्या जड ठेवीचा (हेवी डिपॉझिट) अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी एका एजंटसह चौघांविरुद्ध आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आमिर अफल खांडवाला, मोहम्मद आसिफ नबीउल्ला शेख, शबाना मोहम्मद आसिफ शेख आणि सलमा सिंकदर खान अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. तक्रारदार अनिवासी भारतीय असून, ते ब्रिटिश नागरिक आहेत. त्यांचे आई-वडील जोगेश्वरी परिसरात राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांनी मुंबई शहरात नवीन व्यवसाय सुरू केला असून, त्यात गुंतवणूक करायची होती. याच दरम्यान त्यांची एजंट आमिरशी ओळख झाली होती. त्याने त्यांना जड ठेवीवर फ्लॅट घेऊन ते फ्लॅट जास्त भाड्याने देण्याचा सल्ला दिला होता. त्याची ही योजना चांगली होती. त्यामुळे त्यांनी आमिरच्या सांगण्यावरून जोगेश्वरीत दोन फ्लॅट घेतले होते. त्यासाठी त्याने मोहम्मद आसिफ, शबाना आणि सलमा खान यांना अनुक्रमे २१ लाख आणि ३१ लाख रुपये दिले होते.
ठरल्याप्रमाणे त्यांच्यात एक वर्षाचा करार झाला होता. मात्र एक वर्षांनी त्यांना जड ठेवीची रक्कम परत केली नाही. चौकशीदरम्यान आमिरने फ्लॅटमालक म्हणून ओळख करून देणाऱ्या तिघांच्या मालकीचा तो फ्लॅट नव्हता. आमिरने त्यांना बोगस फ्लॅटमालक म्हणून समोर केले होते. आमिर हा फसवणुकीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
शबाना, सलमा आणि मोहम्मद आमिरकडे पैशांची मागणी केल्यानंतर त्यांनी हेवी डिपॉझिटची रक्कम आमिरला दिल्याचे सांगितले होते. मात्र आमिर हा श्रीलंका येथे पळून गेला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी संबंधित चारही आरोपींविरुद्ध आंबोली पोलिसांत तक्रार केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: डॉक्टर म्हणाले अर्ध्या तासात अ‍ॅडमिट करा… पण पुण्याच्या ट्रॅफिकने घेतला जीव; आता रिक्षावाले काकाच बनले ट्रॅफिक पोलीस

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! कृष्ण जन्माष्टमी अन् दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत झालेत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग...

Virender Sehwag: 'धोनीने टीम इंडियातून बाहेर केल्यावर निवृत्ती घेणार होतो, पण तेंडुलकरने मला...', सेहवागचा धक्कादायक खुलासा

Independence Day 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला स्वत:चाच विक्रम; स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केले तब्बल १०३ मिनिटे भाषण

Latest Marathi News Live Updates : मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT