मुंबई

डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न

CD

पनवेल, ता. २४ (वार्ताहर) : मुख्य चौकात असलेल्या भारतीय संसद भवनाच्या प्रतिकृतीवर चढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने सोमवारी (ता. २३) सकाळी केला. पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पनवेल शहर पोलिसांनी त्याला ॲट्रॉसिटी कायद्यानुसार अटक केली आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी शैलू ऊर्फ गोला पंडित अशोक शुक्ला (३८) हा करंजाडे भागात राहण्यास असून, तो भंगार विकण्याचे काम करतो. सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी शैलू पनवेलमधील मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेल्या परिसरात घुसला होता. त्यानंतर त्याने तेथील भारतीय संसद भवनाच्या प्रतिकृतीवर चढून डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला धरून आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. या प्रकारामुळे त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली. शैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्या ठिकाणी आलेल्या वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्याला खाली खेचले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पनवेल शहर पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्याच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT