छतावर फुलवली बाग
जिल्हा माहिती कार्यालयातील अभिनव उपक्रम
ठाणे शहर, ता. २४ (बातमीदार) : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे, यासाठी मिळेल त्या जागेवर झाडे लावणे, उद्यान निर्माण करणे आवश्यक आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयानेदेखील पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येत अशा उद्यानाची निर्मिती केली आहे. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने आपल्या छतावर टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक बाग फुलवली आहे. ही बाग केवळ सजावटीसाठी नसून, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीचा संदेश देत आहे.
‘ट्री मॅन’ म्हणून ओळख असलेले पर्यावरणप्रेमी विजयकुमार कट्टी आणि जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या संकल्पनेतून या बागेची निर्मिती झाली. टाकाऊ लाकूड, प्लॅस्टिक, कपडे अशा वस्तूंमधून नवनिर्मिती करत झाडांची मांडणी केली आहे. ट्रेसीना, एलिफंट इअर, स्नेक प्लांट, जास्वंद, लेमन ग्राससह तब्बल ४५ प्रकारची झाडे या बागेत लावण्यात आली आहेत. प्रत्येक वस्तू वापरून फेकण्याऐवजी तिला दुसरे आयुष्य देता येते, हेच मी या बागेच्या माध्यमातून दाखवतो आहे. इथे प्रत्येक रोप म्हणजे शिक्षक आहे, तो आपल्याला संयम, जबाबदारी आणि निसर्गाशी संवाद शिकवतो. असे कुट्टी यांनी सांगितले.
बागेची वैशिष्ट्ये :
बाग केवळ कार्यालयाच्या सौंदर्यात भर घालत नाही, तर परिसरात गारवा निर्माण करत उष्णतेचा परिणाम कमी करते, शिवाय डास प्रतिबंधक वनस्पतींचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
संपूर्ण रचना पर्यावरणस्नेही असून, छतावरील बागेचा हा प्रयोग शाळा, महाविद्यालये, ग्रामीण भागातील गृहनिर्माण संस्था आणि शासकीय इमारतींमध्ये सहजपणे राबवता येण्याजोगा आहे.
बाग केवळ उपक्रम न राहता एक जनचळवळ व्हावी, यासाठी सरकार, समाज आणि प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. बागेचा उद्देश हिरवळ निर्माण करणे नाही, तर लोकांमध्ये कचऱ्याविषयीचा दृष्टिकोन बदलणे, जागृती घडवणे आणि समाजात सकारात्मक वर्तन परिवर्तन घडवणे हा आहे.
विजयकुमार कट्टी, ट्री मॅन, ठाणे
“बागेचा उद्देश केवळ हिरवळ निर्माण करणे नाही, तर कचऱ्याविषयी दृष्टिकोन बदलणे, जनजागृती करणे आणि समाजात सकारात्मक वर्तन घडवणे हा आहे,”
– मनोज सानप, जिल्हा माहिती अधिकारी
झाडांची संख्या – ४५ हून अधिक
▪️ झाडांचे प्रकार
ट्रेसीना
एलिफंट इअर
स्नेक प्लांट
जास्वंद
हेनीकेनी
लेमन ग्रास
▪️ उपयोग
टाकाऊ वस्तूंना दुसरे आयुष्य
उष्णता कमी करणारी रचना
डास प्रतिबंधक वनस्पती
परिसरात गारवा
जनजागृतीसाठी एक मॉडेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.