मुंबई

रायगड

CD

नागाव बंदरातील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्‌घाटन
अलिबाग (वार्ताहर) ः नागाव बंदर येथे उभारण्यात आलेल्‍या नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्‌घाटन माजी सरपंच नंदकुमार मयेकर, विद्यमान सरपंच हर्षदा मयेकर, ग्रामविकास अधिकारी श्वेता कदम, ग्रामपंचायत सदस्य निकिता पाडेकर, कल्पना काठे, मंगल नागे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. हा प्रकल्प पूर्णपणे स्वयंचलित असून, गावकऱ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक खोलीचे संपूर्ण बांधकाम सचिन राऊळ यांनी केले, तर बाह्य परिसरातील मार्गसुविधा प्रीतेश घरत यांनी दिली. गावात याआधीपासून एक प्रकल्प कार्यरत असताना आता दुसरा प्रकल्‍प सुरू झाल्‍याचे सरपंच हर्षदा मयेकर यांनी सांगितले. उमटे धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई वाढत आहे. अशा वेळी प्रत्येक नागावकराला सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी नागावच्या प्रत्येक विभागात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट असल्‍याचे मयेकर यांनी सांगितले.
-------------------

राम वरदायिनी विद्यालयात साहित्‍य वाटप
पोलादपूर (बातमीदार) : ‘आपली माती आपली माणसं’ या सामाजिक संस्थेच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील श्री राम वरदायिनी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच तरुणांना हेल्मेटचे वाटप केले. या उपक्रमांतर्गत जवळपास १.००० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, २,५०० वृक्ष रोपांचे वाटप तसेच १०० तरुणांना हेल्मेट वाटप करण्यात आले. याशिवाय विविध सामाजिक, शैक्षणिक, उद्योजक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘नरवीर सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपस्‍थित दिग्‍दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष हनुमान जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे, महावितरण अधिकारी बाळू चोरमारे, पोलिस निरीक्षक आनंद रावडे आणि इतर सरकारी अधिकारी उपस्‍थित होते.

-------------------
अमली पदार्थविरोधी सप्ताहानिमित्त पोलिसांकडून मार्गदर्शन
पेण (वार्ताहर) : महाराष्ट्र पोलिस प्रशासनाच्या वतीने २० ते २६ जूनदरम्‍यान अमली पदार्थविरोधी सप्ताह साजरा केला जातो. त्याअनुषंगाने पेण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात आले. रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशानुसार तसेच उपअधीक्षक गजानन टोम्पे व निरीक्षक संदीप बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली पेणमधील शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे अमली पदार्थाविरोधात प्रबोधन करण्यात आले. उद्याचा बलसागर भारत घडविण्यासाठी शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे, यासाठी कार्यशाळा, परिसंवादांतून जनजागृती करण्यात येत आहे. या वेळी पेण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्ता देवकते, अंमलदार किशोर घरत, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
----------------

श्रीकांत तळेकर यांचे निधन
तळा (बातमीदार)ः तळा तालुक्यातील परीट आळीतील रहिवासी श्रीकांत तळेकर (४२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. जेएनपीटी उरण येथे ते काही वर्षे कार्यरत होते. सर्वांना वेळप्रसंगी मदत करणारे अशी गावात त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, आईवडील असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी १ जुलै आणि तेरावे उत्तरकार्य ३ जुलै रोजी राहत्‍या घरी होणार असल्‍याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT