मुंबई

पालिकेच्या ६४ भूखंडांच्या पुनर्विकासासाठी २ जुलै रोजी निविदा

CD

पालिकेच्या ६४ भूखंडांच्या पुनर्विकासासाठी २ जुलै रोजी निविदा
सर्वाधिक रक्‍कम देणाऱ्या विकसकांना मिळणार संधी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः मुंबई महापालिकेच्या ६४ भूखंडांवरील झोपड्यांच्या पुनर्विकासाला पालिकेकडून चालना मिळाली आहे. रखडलेल्या ६४ योजनांतील झोपडीधारकांना दिलासा मिळणार आहे. पालिकेने काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या निविदापूर्व बैठकीला ४० पेक्षा अधिक विकसकांमध्ये काही बडे विकसकही सहभागी झाले होते. याबाबतच्या निविदा आता २ जुलै रोजी काढल्या जाणार आहेत.
जास्त प्रीमियमची रक्‍कम देणाऱ्या विकसकांना संधी देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. विकसक किती प्रतिसाद देऊन निविदा प्रक्रियेत सहभागी होतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
  पालिकेला ६४ योजनांचा पुनर्विकास करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डीसीपीआर २०३४ अंतर्गत नियमन ३३ (१०) नुसार ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याआधी नुकतीच पालिका मुख्यालयात निविदापूर्व बैठक पार पडली. यात ४० पेक्षा अधिक विकसक सहभागी झाले होते. या बैठकीत संयुक्‍त पद्धतीने पुनर्विकास करण्याची परवानगी मिळावी, योजनेतील सर्व माहिती अद्ययावत करून मिळावी, अशा सूचना विकसकांनी केल्या. जास्तीत जास्त रक्‍कम देणाऱ्या विकसकांचा पुनर्विकासासाठी विचार केला जाईल.
दुसरीकडे प्रकल्पबाधितांसाठी पुरेसा घरांचा साठा अपेक्षित असताना पालिका  प्रीमियमला प्राधान्य देणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अपेक्षेपेक्षा जास्त विकसकांचा प्रतिसाद मिळाल्‍यास लॉटरी काढून निवड केली जाईल, अशी भूमिका प्रशासनाने मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT