मुंबई

पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सायकली व शैक्षणिक साहित्याचे वाटप

CD

आदिवासी विद्यार्थ्यांना सायकलवाटप
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : वाडा तालुक्यातील गाव काटी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. रविवारी या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत सायकल आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले होते.

उपक्रमासाठी ट्रस्टचे पदाधिकारी प्रशांत देसाई यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या समवेत ट्रस्टचे सदस्य सहभागी होते. शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज दोन ते तीन किलोमीटर अंतर पायी चालून शाळेत जावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत शाळेने आपुलकी ट्रस्टशी संपर्क साधला. ट्रस्टने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे २५ सायकली तसेच वह्या, पुस्तके, दप्तर, कंपास सेट आदी शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना भेट दिले.

सायकलवाटप केल्याने विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुलभ होणार असून, शिक्षणात अधिक उत्साह निर्माण होईल, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला. आपुलकी ट्रस्टच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी ट्रस्टचे आभार मानले आहेत. दरम्यान, आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टने यापूर्वीदेखील विविध भागात सामाजिक उपक्रम राबवले असून, गरजूंसाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या दृष्टीने मदतकार्य करण्याचा वसा सातत्याने सुरू ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HIV injection attack : लग्न मोडलं… सूडाने पेटलेल्या तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन; संपूर्ण प्रकरण काय?

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Katha Arunachi Marathi Play : मिलिंद शिंदे यांची 'कथा अरुणाची' नाटकातील संघर्षमय यात्रा

कुंभ राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मंगळ-बुध युतीचा प्रभाव, गुढीपाडव्यापासून शुभ संकेत

New Marathi Book : मराठी भाषेच्या वर्तमानावर डॉ. सुधीर रसाळ यांचे परखड चिंतन

SCROLL FOR NEXT