मुंबई

माळरानांवर भरघोस पिकाची बेगमी

CD

टोकावडे, ता. २५ (बातमीदार)ः मुरबाड तालुक्यात वांगी, मिरची, रताळेच्या वेलीची लागवड केली जाते. माळरानावर अशा रोपांच्या लागवडीतून भरघोस पीक येत असल्याने सरळगावच्या आठवडा बाजारात लहान रोपांची मागणी वाढली आहे.
सरळगावच्या आठवडा बाजारात तालुक्यातील शेतकरी भाजी, किराणा, सुकी मच्छी अशा वस्तू खरेदीसाठी येतात. तसेच बैल, म्हशींची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीसाठी शहापूर, नगर, ओतुर, आळेफाटा येथून अनेक व्यापारी येतात. त्यामुळे या बाजारात मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. त्यामुळे रोपांना ग्राहक चांगल्या प्रकारे मिळत असल्याचे बोलले जाते. परिसरातील अनेक शेतकरी उन्हाळ्यात बियांची पेरणी करून त्यांची जोपासणा करतात. नंतर पावसाळा सुरू झाल्यावर बाजारपेठेत लहान रोपांच्या जुडीची ९० ते १०० रुपयांना विक्री होते. मुरबाड, सरळगाव, धसई, म्हसा परिसरातील शेतकरीही रोप खरेदीसाठी येतात.
--------------------------------------
उत्पन्नाचे साधन
- मिरची, वांगी यांची लहान रोपे तयार करून विक्रीसाठी येतात. या रोपांची लागवड करण्यासाठी माळरानावर सरळ रेषेत माती ओढून लांबच्या लांब वाफे तयार केले जातात. त्यावर वांगी, मिरची तसेच रताळेची वेल लावली जाते. त्यापासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते.
- रताळे कंदमुळे यांच्या वेलीपासून केली जाते. ठरावीक अंतरावर पेरावर वेलीला मुळे आलेली असतात. त्या पेरावर कट करून ही वेलीची मातीत तिरपी लागवड केली जाते. त्यामुळे या वेलीला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्र यांचं निधन, 2014ला मोदींनी वाराणसीतून लढावं यासाठी बजावलेली महत्त्वाची भूमिका

Monsoon Maharashtra : 'या' तारखेपासून मान्सून महाराष्ट्रातून माघारी परतणार; IMD कडून महत्त्वाचं अपडेट, कृषी विभागानंही केलं शेतकऱ्यांना आवाहन

Dussehra Melava 2025 Live Update : RSS च्या विजयादशमी सोहळ्याला सुरुवात, मोहन भागवत यांच्या भाषणाकडे लक्ष..

Vijayadashami 2025: दसऱ्याच्या दिवशी राशीनुसार करा 'या' वस्तूंचे दान, बदलेल नशीब

Gold Rate: दसऱ्याला सोनं घेण्याचा विचार करताय, कसा असेल आजचा भाव?

SCROLL FOR NEXT