विजेचा भार वाढल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान
भरपाईसाठी शिवसेना-युवासेनेचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
उल्हासनगर, ता. २५ (बातमीदार) ः संततधार पावसात विजेचा लपंडाव आणि त्यात अचानक शनिवारी (ता. २१) विजेचा भार वाढल्याने उल्हासनगरात शंभरच्या वर घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले आहे. याबाबत वस्तूंची नुकसानभरपाई मिळण्यासाठी शिवसेना व युवासेनेने महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता हरीश भराडे यांना निवेदन दिले आहे.
मागील काही दिवसांपासून कॅम्प नंबर एकमधील तानाजी नगर, गणगौर चौक परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. असे असतानाच शनिवारी पुन्हा अचानक विद्युतपुरवठ्याचा भार वाढल्याने शंभरपेक्षा अधिक घरातील टीव्ही, फ्रीज, पाण्याच्या मोटारी, वाय-फाय राऊटर यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
ही घटना घडल्यानंतर शिवसेना शाखाप्रमुख केशव ओवळेकर यांनी तत्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून याची माहिती दिली, पण त्यास प्रतिसाद न मिळाल्याने सोमवारी (ता. २३) उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड, युवासेना शहर अध्यक्ष बाळा श्रीखंडे, शाखाप्रमुख केशव ओवळेकर यांनी नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. तसेच वीजबिल एकत्र करून महावितरणचे कार्यकारी अभियंता हरीश भराडे यांना निवेदन देत लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.