मुंबई

पालिका इमारतीला नवा साज चढणार

CD

उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेच्या जीर्ण प्रशासकीय इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी अखेर ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरच्या नागरी सुविधांच्या व्यवस्थापनात लवकरच नवीन सुरुवात होणार आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने मंजूर केलेला हा निधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला आहे. ही केवळ सुरुवात असून, टप्प्याटप्याने पुढील निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेची प्रशासकीय इमारत अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहे. वेळोवेळी स्लॅबचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडत असल्याने अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे जीव धोक्यात आले होते. त्यामुळे नव्या प्रशासकीय मुख्यालयाची गरज तीव्रतेने जाणवत होती. महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मागणीनंतर खासदार डॉ. शिंदे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला होता. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिका क्षेत्रात मुलभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत हा ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. ही रक्कम पहिल्या टप्प्यात देण्यात आली असून, संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक निधी पुढील टप्प्यांमध्ये दिला जाईल. या निर्णयामुळे पालिकेच्या नवीन इमारतीचा आराखडा तयार होऊन कामाला चालना मिळणार आहे.

सुसज्ज, आधुनिक वास्तू उभारणार
उल्हासनगर हे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. येथे हजारो व्यापारी आणि ग्राहक दररोज ये-जा करतात. त्यांच्या सेवेसाठी महापालिकेच्या कार्यक्षमतेत सुधारणा होणे गरजेचे होते. यापूर्वीही खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून शहरात रस्ते काँक्रीटीकरण, भुयारी गटार योजना, क्रीडा संकुल, रुग्णालय उभारणी, मैदान आणि उद्यानांचा विकास यांसारखी कामे सुरू झाली आहेत. आता या प्रशासकीय इमारतीच्या पुनर्बांधणीमुळे शहराच्या प्रशासकीय व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि परिणामकारकता येण्याची अपेक्षा आहे. महापालिकेच्या नव्या इमारतीबाबत भविष्यात एक भव्य, सुसज्ज आणि आधुनिक वास्तू उभारण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT