मुंबई

सुरक्षा पर्यवेक्षक जेरबंद ; ठाणे एसीबीची कारवाई

CD

लाचेची रक्कम स्वीकारताना सुरक्षा पर्यवेक्षक जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ ः शाळेत सकाळची शिफ्ट देण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांची मागणी करीत एक हजार रुपये स्वीकारणाऱ्या मुंबई सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा पर्यवेक्षक यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. शांताराम महादेव धनगर असे सुरक्षा पर्यवेक्षकाचे नाव आहे. ही कारवाई वर्तकनगर शाळा क्रमांक ४४ येथे सोमवारी (ता. २३) करण्यात आली.
शांताराम धनगर हे माजिवडा येथे राहणारे असून त्यांची बृहन्मुंबई आणि ठाणे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुरक्षा रक्षकांच्या शिफ्टचे नियोजन करण्यासाठी सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार ते सुरक्षा रक्षकांना शिफ्ट देण्याचे काम करतात. त्याप्रमाणे सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा मंडळांतर्गत तक्रारदार यांना ठाणे महानगरपालिका शाळा नं. ६५ येऊर येथे सकाळची शिफ्ट देण्याकरिता पाच हजार रुपयांची मागणी केली. यानुसार दरमहा पाचशे रुपयांप्रमाणे मागील तीन महिन्यांचे एकूण एक हजार ५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी (ता. २०) ठाणे एसीबीने केलेल्या पडताळणीमध्ये धनगर यांनी तक्रारदारांकडे एक हजार रक्कमेची मागणी करून ती स्वीकारण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे सोमवारी (ता. २३) एक हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती एसीबीने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू; मोहफुले वेचताना हल्ला, मृतदेह फरकटत नेऊन पायाचे लचके तोडलं अन्..

Malad East Mumbai Accident : मुंबईत पुन्हा एकदा 'खड्डा' ठरला कर्दनकाळ; बांधकाम व्यावसायिकाच्या एका चुकीमुळं 8 वर्षांच्या दिव्यांशचा करुण अंत, चेंडू काढायला गेला अन्...

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

Latest Marathi News Live Update : गंगापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

Ashok Kharat Case : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार ? रुपाली पाटील यांच्या पोस्टने खळबळ

SCROLL FOR NEXT