मुंबई

वैतरणा नदीचा काठ खचला

CD

वैतरणा नदीचा काठ खचला
पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या पडल्या उघड्या; मनोरकरांना करावा लागणार पाणीटंचाईचा सामना

मनोर, ता. २५ ः पाण्याच्या प्रवाहामुळे सायलेंट रिसॉर्टजवळील वैतरणा नदीचा काठ खचला आहे. यामुळे मनोर ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी उघडी पडली असून, ती तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. जलवाहिनीचा आधार खचल्याने दोन पाइपमधील सांधा निखळून मनोरचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मनोर गावच्या पाणीपुरवठा योजनेला वैतरणा नदीवरील सायलेंट रिसॉर्टलगतच्या बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो, परंतु मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वैतरणा नदीला पूर आला होता. सोमवारी (ता. २३) सायंकाळी पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे बंधाऱ्याच्या खालच्या बाजूकडील नदीचा काठ खचला आणि नदीकाठची माती पात्रात वाहून गेल्याने मनोरच्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी उघडी पडली आहे. मातीअभावी जलवाहिनीचा आधार निघून गेल्याने दोन पाइपमधील सांधा निखळून जलवाहिनी नादुरुस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंधाऱ्याच्या खालच्या बाजूकडील नदीकाठच्या १५ ते २० फूट खोल आणि ३० ते ४० फूट रुंद भागातील माती वाहून गेल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे.

जोरदार पाऊस, पूर आणि नदीकाठच्या भूस्खलनामुळे जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा मनोर गावच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मंगळवारी (ता. २४) सकाळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेची पाहणी केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांनी दिली.

कंत्राटदाराने पाणीपुरवठा योजनेची कामे अपूर्ण ठेवल्याने ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजना ताब्यात घेतलेली नाही. याप्रकरणी ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- नितीन पवार, ग्रामपंचायत अधिकारी, मनोर ग्रामपंचायत

पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यवधींचा खर्च
चार कोटी ३५ लाख रुपये खर्च करून मनोरच्या पाणीपुरवठा योजनेच्या बंधाऱ्यांची उंची वाढवण्यात आली आहे. चार लाख २० हजार लिटर पाणी साठवण क्षमता असलेली टाकी, दीड लाख लिटर आणि ६० हजार लिटर क्षमतेच्या दोन साठवण टाक्या, जॅकवेलपासून मुख्य साठवण टाकीपर्यंत १२ इंचाची नवीन जलवाहिनी आणि साठवण टाकीतून गावातील वितरणासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli BJP vs Congress politics : सांगली जिल्ह्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसचा गणिमी कावा; मिरजमध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्वच एकवटले

Shivam Dube: साधेपणा pro-max! वर्ल्डकप जिंकून देणारा शिवम दुबे चक्क रेल्वेने घरी, नेटकऱ्यांनी केला सलाम

Latest Marathi News Live Update : विधानभवनाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Chandoli Forest Leopard Sighting : सांगलीच्या चांदोलीत वाघांनंतर आता 'या' दुर्मिळ पाहुण्याची एन्ट्री; सफारीदरम्यान पर्यटकांना मिळालं खास सरप्राईज!

SSC Exam Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर तीन दिवस आधीच फुटला, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल, बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिह्न

SCROLL FOR NEXT