मुंबई

डोंबिवलीत भटक्या श्वानांचा लहान मुलावर हल्ला

CD

भटक्या श्वानांचा लहान मुलावर हल्ला
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : कल्याण-डोंबिवलीत भटक्या श्वानांनी पुन्हा एकदा लहान मुलावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वेत सात ते आठ श्वानांनी पाचवर्षीय चिमुरडीवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर परिसरातील बेबीबाई निवास येथे पाच भटक्या श्वानांनी एका बालकावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले आहे. मंगळवारी (ता. २४) सकाळी ही घटना घडली आहे. श्वानांनी केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी सकाळी साडे १० वाजताच्य बेबी निवास परिसरात एका घरातील लहान मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर पडला. तो रस्त्यावर येताच रस्त्यावर आजूबाजूला चार ते पाच भटके श्वान उभे होते. मुलगा घरासमोरील मोकळ्या जागेत खेळण्यासाठी जात असतानाच एका श्वानाने त्याच्यावर हल्ला करत चावा घेतला. तेवढ्यात आणखी काही श्वानांनी मुलावर हल्ला केला. श्वानांनी मुलाच्या पायाला, हाताला चावा घेत फरपटत नेले. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मुलाने बचावासाठी आरडाओरडा करताच तेथून जात असलेल्या एका पादचाऱ्याने श्वानांच्या दिशेने दगडी फेकून मुलाची सुटका केली. या मुलाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते; मात्र आता त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे. बेबीबाई निवासमधील रहिवासी अनिकेत शरद गायकवाड यांच्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला आहे. भटक्या श्वानांच्या या वाढत्या उपद्रवाचा पालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

डोंबिवली पश्चिमेत उमेशनगर, महाराष्ट्रनगर, गोपीनाथ चौक, मोठागाव, कोपर भागात भटक्या श्वानांचा नागरिकांना त्रास होत आहे. डोंबिवली पूर्वेत बापूसाहेब फडके रस्त्यावर बापूसाहेब जोशी पथावरील एका अरुंद रस्त्यावर दोन भटके श्वान सतत नागरिकांचा पाठलाग करतात. अनेकांना यापूर्वी या श्वानांनी चावा घेतला आहे. रात्रीच्या वेळेत घरी परतणाऱ्या नोकरदारांना, रिक्षाचालकांना भटक्या श्वानांचा त्रास सहन करावा लागतो.

पालकांमध्ये भीतीचे वातावरण
शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी, पालक अधिक संख्येने रस्त्याने जातात. त्यांना या भटक्या श्वानांचा सर्वाधिक उपद्रव आहे. डोंबिवलीत भटक्या श्वानांचा उपद्रव वाढत असताना पालिका आरोग्य विभागाकडून या श्वानांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. पालिका आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य विभागाला या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याचे आदेश देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai-Virar : विरार पाण्याखाली! मुसळधार पावसाने रस्त्यांची झाली 'नदी’, गाड्या-घरे जलमय अवस्थेत, पाहा Video

India China Trade : अमेरिकेशी ट्रेड वॉर सुरू असताना आता भारतासाठी चीनने केली ‘ही’ मोठी घोषणा!

रहस्य, ड्रामा आणि थ्रिल... 'दशावतार'चा ट्रेलर पाहिलात का? दिलीप प्रभावळकर आणि भरत जाधवची अभिनय एकदा बघाच

Bombay High Court : ईडीच्या जप्ती आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाचा ब्रेक, अविनाश भोसले यांना दिलासा

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल!

SCROLL FOR NEXT