बोळिंज, ता. २५ ः सोशल मीडियावर ‘वर्क फ्रॉम होम’च्या प्रलोभनातून तब्बल नऊ लाख ६५ हजारांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात बोळिंज पोलिसांनी दिल्लीतील एका सायबर गुन्हेगाराला अटक केली आहे.
विरार पश्चिमेतील रहिवासी नीलेश पाटील यांच्याशी ऑक्टोबर २०२४ मध्ये टेलिग्राम आयडीवरून संपर्क साधण्यात आला होता. या वेळी वर्क फ्रॉम होममधून पैसे कमावण्याची संधी असल्याचे सांगत ऑनलाइन टास्कसाठी लिंक पाठवण्यात आली होती. काही टास्क पूर्ण केल्यावर परताव्याच्या स्वरूपात रोख रक्कम खात्यात येत असल्याने पाटील यांची तब्बल नऊ लाख ६५ हजार ५७७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बोळिंज पोलिसांनी सायबर विश्लेषण आणि तांत्रिक तपासाआधारे विविध खात्यांचा तपशील मिळवला होता. या वेळी दिल्ली येथून धनादेशाने तर काही रक्कम एटीएममधून काढण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांना रामपुरा, दिल्ली येथील विशाल खुबडला (वय २८) अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.