खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर मशीनला आग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमधील व्हेंटिलेटर मशीनला किरकोळ आग लागल्याची घटना बुधवारी (ता. २५) सकाळी साडेदहाच्या सुमारास ऋतू पार्क परिसरात समोर आली. ज्या आयसीयू वॉर्डमधील मशीनला आग लागली, त्या वॉर्डमध्ये प्रदीप सिंग (६६) हे रुग्ण उपचारासाठी दाखल होते. त्यांना तत्काळ सुरक्षितस्थळी नेल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
ऋतू पार्क सर्व्हिस रोड या ठिकाणी आलेल्या तळ अधिक दोन मजली इमारतीमधील प्रियंका महांगडे यांच्या मालकीच्या वृंदावन रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमधील व्हेंटिलेटर मशीनला किरकोळ आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी दिनेश पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्या वेळी त्या रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये एक तर जनरल वॉर्डमध्ये पाच असे सहा रुग्ण उपचारासाठी दाखल होते. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महावितरण कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे नियंत्रणात आणली.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.