मुंबई

राजकीय पक्षांमध्ये बैठकांचे सत्र

CD

प्रकाश पाटील ः सकाळ वृत्तेसवा
पालघर, ता. २५ ः स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर निवडणूक विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग निश्चित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. याच अनुषंगाने प्रशासनाकडून प्रभाग निश्चिती करून त्यासंबंधीचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहेत. त्यामुळे निवडणुकांचे बिगुल वाजणार असल्याने राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
पालघर जिल्हा परिषदेची २०१९ मध्ये निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ५७ पैकी १९ जागा या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होत्या, तर १९ जागा या अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव होत्या. नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी सात तर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आठ जागा आरक्षित होत्या. अशातच पालघर जिल्ह्याची लोकसंख्या गेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांएवढी असल्यामुळे प्रभाग रचना किंवा गट बदलण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते, मात्र दुसरीकडे प्रभाग रचना बदलल्यास गटाचे नाव व गणाचे नाव बदलले जाईल, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. पालघर वसई तालुका हा अंशतः अनुसूचित जमाती क्षेत्रामध्ये मोडतो, तर इतर सहा तालुके पूर्णतः अनुसूचित क्षेत्रांमधील असल्यामुळे त्या ठिकाणी अनुसूचित जमातीचे आरक्षण असणार आहे. काही ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर काही ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण पडणार आहे. गेल्या वेळेच्या आरक्षणामध्ये यंदा बदल होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.
-------------------------------
सध्याचे पक्षीय बलाबल
२०१९ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये तत्कालीन शिवसेना अर्थात ठाकरे गटाचे २० सदस्य होते. भाजपचे १२ सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ सदस्य, काँग्रेसचा एक, माकपचे पाच सदस्य, बहुजन विकास आघाडीचे चार सदस्य, तर तीन जागी अपक्ष निवडून आले होते. महाविकास आघाडीमध्ये पडलेल्या फुटीनंतर ठाकरे गटाचे तब्बल १७ सदस्य शिंदेंच्या शिवसेनेकडे आले. तीन सदस्य ठाकरे गटाकडे आहेत, तर काँग्रेसचा एकमेव सदस्य भाजपकडे गेल्याने भाजपची संख्या १४ झाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या १३ झाली. बहुजन विकास आघाडीकडे पाच, तर माकपकडे पाच सदस्य आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Case: ''वाल्मिक कराडच्या बंगल्यातून अजूनही सूत्र हलतात, धनंजय मुंडेंचा संबंध नाही'', ज्ञानेश्वरी मुंडेंनी स्पष्ट सांगून टाकलं

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Stock Market Today: शेअर बाजार लाल रंगात बंद! मोठी घसरण झाली तरी हे स्टॉक मात्र वाढले

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

SCROLL FOR NEXT