मुंबई

सांताक्रूझमधील कपनीच्या कार्यालयात आग

CD

सांताक्रूझमधील कपनीच्या कार्यालयात आग
मुंबईसह उपनगरांत आगीच्या घटनांमध्ये वाढ
घाटकोपर ता. २५ (बातमीदार) ः घाटकोपर, गोरेगाव चित्रनगरी तसेच सात रस्ता भागात गेल्या आठवडाभरात आगीच्या दुर्घटना घडल्या होत्या. आज (ता. २५) सकाळी सांताक्रूझ भागात प्राइम आरएमसी कंपनीच्या कार्यालयात आगीची घटना घडली. वेळीच आग विझवल्‍याने कोणतेही नुकसान झाले नाही.
सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. त्यानंतर पालिकेचे कर्मचारी, पोलिस तसेच अग्निशमन दलाच्या यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. विंडसर इमारत, सीएसटी रोड, सांताक्रूझ (पूर्व) येथील सुमारे चार ते पाच हजार चौरस फूट परिसरात प्राइम आरएमसी कंपनीच्या सातव्या मजल्‍यावरील कार्यालयात धूर पसरला होता. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, अशी माहिती देण्यात आली.
आठवडाभरात घडलेल्‍या आगीच्या चार दुर्घटनांमुळे विविध यंत्रणांपुढे आव्हान उभे राहिले आहे. मुंबईत शनिवार ते सोमवारपर्यंत तीन दिवसांत सलग चार ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. त्यात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. शनिवारी २१ जून रोजी सातरस्ता येथे दोन मजली इमारतीत लागलेल्या आगीच्या घटनेत १० ते १२ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली होती, तर २२ जून रोजी घाटकोपरमधील आर्किड टॉवरमध्ये आग लागली होती. तेथेही अग्निशमन दलाने तत्काळ आग विझवल्याने मोठा धोका टळला, तर त्यानंतर सोमवारी २३ जून रोजी मरीन लाइन्स येथील इमारतीत शॉर्टसर्किट झाल्याने आगीची घटना घडली होती. या घटना ताजी असतानाच गोरेगाव येथील चित्रनगरीत अनुपमा स्टुडिओमध्ये लागलेल्या भीषण आगीत स्टुडिओ जळून खाक झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

SCROLL FOR NEXT