नापासाचा शिक्का पुसण्याची संधी
२४ जूनपासून दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा; पनवेलमध्ये ८३८ विद्यार्थी
पनवेल, ता. २५ (बातमीदार) ः इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबरोबरच ज्यांना श्रेणी सुधारणा करायची आहे, अशांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा मंगळवार २४ जूनपासून सुरू झाली आहे. यासाठी पनवेल विभागात येणाऱ्या दहावी-बारावीच्या नापास विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
पनवेल तालुक्याचा दहावीचा निकाल ९६. ८८ टक्के लागला आहेत. पनवेल तालुक्यातील १३५ शाळांमधील १२ हजार ७९४ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ३९६ विद्यार्थी दहावी इयत्तेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. यामध्ये जवळपास ३९८ विद्यार्थी नापास झाले होते, तर बारावीत ११ हजार ८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात १० हजार ६४७ विद्यार्थी पास झाले आहेत. बारावीमध्ये ४४० अनुत्तीर्ण झाले होते. असे दहावी व बारावीचे मिळून ८३८ विद्यार्थी नापास झालेले आहेत. यंदा जवळपास दीड महिना आधी ही परीक्षा होत आहे. त्यानुसार यंदा बारावीची पुरवणी परीक्षा २४ जून ते १६ जुलै या कालावधीत, तर दहावीची पुरवणी परीक्षा २४ जून ते ४ जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने पनवेलमधील बारावीच्या व दहावीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. दहावी व बारावीचे मिळून पाचशेच्या वर विद्यार्थी परीक्षा देतील, असा अंदाज माध्यमिकचे जिल्हा शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी माहिती दिली.
...............
चौकट
परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावे, असा संदेश बोर्डाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.