दादासाहेब मो. कृ. वाणी विद्यालयात योगदिन
डोंबिवली, ता. २५ : मुलांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रत्येक पालकाने योगासने काय आहेत, हे जाणून घेतले पाहिजे. हाच उद्देश समोर ठेवून डोंबिवली पूर्व येथील उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित दादासाहेब मो. कृ. वाणी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ४५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या योग शिबिरात सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांकडून शनिवारी काही योगासने करून घेण्यात आली. मन एकाग्र करणे, अभ्यास करताना होणाऱ्या योगाचे फायदे त्याबाबतची माहिती आसन करताना सांगितली. शाळेचे मुख्याध्यापक दीपक परदेशी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगताना योगासनामुळे शरीर सुदृढ होते. मनही निरोगी राहते असे सांगितले. हीच चांगली सवय आम्ही आमच्या मुलांमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी म्हटले. हा योग उत्सव साजरा करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी स्वतः योगासने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.