उल्हासनगर, ता. २५ (बातमीदार) : पाण्याचा अंदाज न आल्याने कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथे राहणाऱ्या सुशील गवळी या पर्यटकाचा श्री मलंगगड आंभे गावाजवळील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
पावसामुळे निर्माण झालेले निसर्गरम्य वातावरण आणि त्यात नदीतील बंधाऱ्यात पाण्यातील आनंद लुटण्यासाठी कल्याण पूर्वेतील सुशील गवळी हा शनिवारी सायंकाळच्या सुमारास श्री मलंगगडच्या नदीपात्रात पोहायला आला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. श्री मलंगगड भागातील ही या वर्षातील पहिलीच दुर्घटना आहे. बुडालेल्या सुशीलचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढून उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर त्याचा पार्थिव नातलगांकडे सुपूर्द केला. या दुर्घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद हिललाइन पोलिस ठाण्यात केली असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.