मुंबई

पट्टा

CD

गोशाळांना प्रमाणपत्रांचे वितरण
ठाणे ः महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकरिता अर्ज केलेल्या गोशाळांना अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र वितरण करण्याचा सोहळा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रशांत कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अजिंक्य पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कीर्ती डोईजोडे तसेच तालुकास्तरीय पशुवैद्यकीय अधिकारी, गोशाळा व्यवस्थापक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक सहभागातून राबविण्यात येणाऱ्या पशुसंवर्धन उपक्रमांना जिल्हा परिषद, ठाणे नेहमीच सहकार्य करीत आली आहे. पशुधनाच्या आरोग्य संवर्धनाबरोबरच गोशाळांनी विविध उत्पादनांची निर्मिती करून स्वयंपूर्णता व उत्पन्नवाढ साधावी, असे आवाहन या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.

वैद्यकीय सहाय्यता शिबीर
ठाणे : मुख्यमंत्री सचिवालय व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्या समन्वयाने मानपाडा येथील सेंट झेविअर्स हायस्कूलमध्ये रविवारी (ता. २९) मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर भरविण्यात येणार आहे. या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येऊन आवश्यक रुग्णांवर लवकरच मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे, माजी नगरसेविका स्नेहा आंब्रे, शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे आणि माजी नगरसेविका अर्चना मणेरा यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात तज्ज्ञ व सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून हृदयरोग, मूत्रपिंड, कान, नाक आणि डोळे, दंत, मणका, हाड, मधुमेह, कर्करोग, बालरोग आणि इतर आजारांबाबत रुग्णांची तपासणी करण्यात येईल. तसेच रक्त, ईसीजी, मॅमोग्राफी व कर्करोग चाचणी मोफत केली जाणार आहे. कर्णरोपण तंत्रज्ञान, हृदय प्रत्यारोपण, अस्थी मज्जा (बोन मॅरो) प्रत्यारोपण, प्लॅस्टिक सर्जरीसाठी रुग्णांना मार्गदर्शन करून मुख्यमंत्री निधीतून शस्त्रक्रियांसाठी मदत करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रेमभंग म्हणजे धोका नाही; सहमतीने संबंधानंतर लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार ठरत नाही, फसवणुकीची खरी व्याख्या HC ने सांगितली!

Mumbai Indians IPL 2026 Schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर फक्त दोन सामने खेळणार; जाणून घ्या RCB, RR, KKR अन् DC ला केव्हा व कुठे भिडणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

SCROLL FOR NEXT