झोपडपट्ट्यांतील प्रश्नांकडे लक्ष द्या!
एसआरएच्या कार्यालयावर मुंबई काँग्रेसचा धडक मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : महायुती सरकारच्या राजवटीत एसआरए भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. गोरगरिबांच्या हक्कांवर बुलडोझर फिरवून एसआरचे अधिकारी बिल्डरांसाठी काम करीत आहेत. लोकप्रतिनिधींनाही ते जुमानत नाहीत, अशा मुजोर अधिकाऱ्यांविरोधात व एसआरएमधील भ्रष्टाचाराविरोधात मुंबई काँग्रेसच्या स्लम विभागाने आज (ता. २५) दुपारी एसआरएच्या वांद्रे येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली.
झोपडपट्टीवासीयांची कामे करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, असेही काँग्रेसने बजवाले आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील आणि मुंबईच्या इतर भागातील नागरिकांच्या समस्यांबाबत खासदार वर्षा गायकवाड यांची एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याशी पूर्वनियोजित बैठक निश्चित करण्यात आली होती; मात्र कल्याणकर यांनी बैठकीला उपस्थित न राहता मुजोरीचे दर्शन घडवले होते. त्याच्या निषेधार्थ कल्याणकर यांना जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्या मुंबई स्लम सेलच्या वतीने एसआरए कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांच्या मनमानीचा निषेध नोंदवला आहे.
या मोर्चात संघटन प्रभारी प्रणिल नायर, मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि स्लम सेल विभाग अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस, माजी नगरसेवक बब्बू खान, अशरफ आझमी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कल्याणकर यांनी खासदार गायकवाड यांची माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.