मुंबई

पक्षांचा विमानांना उपद्रव

CD

पक्ष्यांचा विमानांना उपद्रव
वर्सोवा कचरा डेपोवर शेड उभारण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : पक्ष्यांच्या वाढत्या संख्येमुळे वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्र परिसरातील विमान वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. २५) विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत कचरा डेपोवर तातडीने शेड बसवण्याचे आदेश देण्यात आले. येत्या १५ दिवसांत कंत्राट प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही महापालिकेला दिले. या बैठकीला नागरी उड्डाण महासंचालनालय, अदाणी विमानतळ प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

वर्सोवा येथे कचरा हस्तांतरण केंद्र आहे. परिणामी या परिसरात पक्ष्यांची संख्या वाढत आहे. पक्ष्यांच्या या संख्येमुळे विमान वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेत उपनगरचे पालकमंत्री आशीष शेलार यांनी मंत्रालयात पालिका तसेच संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेत यावर तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात निर्देश दिले. यात तातडीने शेड बसवणे तसेच वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्र पूर्णपणे झाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पक्ष्यांचे आकर्षण कमी होईल. समस्या निवारणासाठी जनसहभाग, पक्षी उपद्रवावर उपाययोजना सुचवण्यासाठी स्टार्ट-अप्स, संशोधन संस्था आणि नागरिकांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विशेष समितीची नियुक्ती
वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्रात पक्ष्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी विविध विभागांचे प्रतिनिधी असलेली एक विशेष समिती स्थापन होणार असून, ती उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहे. दीर्घकालीन उपायांचा अभ्यास, सर्व संबंधित विभागांनी पक्षी उपद्रव कमी करण्यासाठी शाश्वत व पर्यावरणपूरक उपाययोजना शोधाव्यात, असे आदेश आशीष शेलार यांनी दिले आहेत. विमान प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावर तातडीने आणि समन्वयातून उपाय करणे आवश्यक असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT