मुंबई

सीबीएसईच्या दहावीची परीक्षा वर्षातून दोन वेळा

CD

सीबीएसई घेणार वर्षातून
दाेनदा दहावीची परीक्षा
अधिक गुण मिळतील ती गुणपत्रिका ग्राह्य धरण्याची मुभा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावीची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली परीक्षा १७ फेब्रुवारीपासून, तर दुसरी (पुरवणी) परीक्षा ५ मेपासून सुरू होईल. पहिली परीक्षा सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य असेल, तर दुसरी परीक्षा ऐच्छिक असणार आहे. दोन्हीपैकी ज्या परीक्षेत अधिक गुण मिळतील, ती परीक्षा अंतिम गुणपत्रिकेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. यासंदर्भातील मसुद्याला सीबीएसईने आज मंजुरी दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात दोन परीक्षा देऊन गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी दिली जाणार आहे. फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणाऱ्या पहिल्या परीक्षेचा निकाल एप्रिलमध्ये तर दुसऱ्या परीक्षेचा निकाल जून महिन्यात जाहीर केला जाईल.
पहिली परीक्षा सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य असेल, तर दुसरी ऐच्छिक असणार आहे. दोन्हीपैकी ज्या परीक्षेत अधिक गुण असतील, ते अंतिम गुणपत्रिकेसाठी ग्राह्य धरले जातील. फेब्रुवारीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी मे महिन्यातील परीक्षेत गुण सुधारण्यासाठी बसू शकतील; परंतु त्यासाठी अधिकाधिक तीनच विषय निवडता येतील. दुसऱ्या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांची लेखी संमती घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसईकडून दहावीच्या अध्ययन, अध्यापन पद्धतीत बदल केला जाणार आहे. तसेच या पद्धतीमुळे कोचिंग संस्कृतीला काही प्रमाणात लगाम लागेल, असा विश्वास सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी व्यक्त केला.
--
गुण सुधारण्याची संधी
पहिल्या परीक्षेत एक अथवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी दुसऱ्या परीक्षेला बसू शकतील; परंतु तीन किंवा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना तेच शैक्षणिक वर्ष परत शिकावे लागणार आहे.
--
क्रीडापटूंकरिता विशेष सवलत
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. त्यांना दोनपैकी कोणत्याही एका परीक्षेला बसण्याची मुभा मिळणार आहे. त्यासाठी त्यांना वैध प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Latest Marathi News Live Update : राज्यसभेबाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत घेतला जाईल- संजय राऊत

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT