मुंबई

पोलिसांनी अपहरणाचा डाव उधळला

CD

पोलिसांनी अपहरणाचा डाव उधळला
चिमुकलीची सुखरूप सुटका

बदलापूर, ता. २५ (बातमीदार) ः बदलापूर शहरात एका साडेचार वर्षांच्या चिमुकलीचे एका अज्ञाताने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पश्चिमेच्या रमेशवाडी भागात राहणाऱ्या श्रेया सवाद या चिमुकलीचे आरोपीने अपहरण केले; मात्र २४ तासांमध्येच बदलापूर पश्चिम पोलिसांनी या अपहरणाचा डाव उधळून लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि मुलीची सुखरूप सुटका केली.
बदलापूर पश्चिम पोलिसांचे या कामगिरीमुळे कौतुक होत आहे. बदलापूर पश्चिम रमेशवाडी या ठिकाणी राहणाऱ्या एका नेपाळी कुटुंबातील साडेचार वय असलेल्या जुळ्या मुलींपैकी एक श्रेया सवाद ही मुलगी खेळत असताना मंगळवारी (ता. २४) दुपारी इमारतीच्या खालून एका अज्ञात व्यक्तीने खाऊचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. या घटनेनंतर धास्तावलेल्या तिच्या पालकांनी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, हा अतिशय संवेदनशील विषय असल्याने आणि चिमुकलीचा जीव धोक्यात असल्याने पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासात खूप काळजी घेतली. शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासून काढले. एका रिक्षाचालकाने समजदारी दाखवून संशय येताच या चिमुकलीचा आणि अपहरणकर्ता रणजित दुर्वे (वय २५) याचा फोटो काढून पोलिसांना याबाबत माहिती दिल्याने पोलिसांनी आरोपीला मध्य प्रदेशातील छिंदवाडा या भागातून ताब्यात घेतले. बदलापूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील उमरेठ पोलिसांची मदत घेत या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. चिमुकलीला सुखरूपपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. चिमुकलीचा शोध घेण्यात आम्हाला यश मिळाले असून उद्या याबाबत संपूर्ण खुलासा करण्यात येईल, असे उल्हासनगर परिमंडळ चारचे उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले.
...
पोलिसांना अश्रू अनावर!
चिमुकलीचा शोध लागल्यावर ती सुखरूप आहे, अशी माहिती समाजमाध्यमांवर सांगताना, बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल थोरवे यांना अश्रू अनावर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

Harish Rana Euthanasia: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालं होतं? इच्छामरण म्हणजे काय? भारतात कायदा काय सांगतो अन् कोणते देश मान्यता देतात?

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

SCROLL FOR NEXT