मुंबई

शंभर युनिटपर्यंत वीज वापर स्वस्त

CD

शंभर युनिटपर्यंत वीज वापर स्वस्त
महावितरणचे १ जुलैपासून नवे दर; इतरांना दरवाढीचा झटका


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : महावितरणने वीजदर निश्चितीबाबत दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने आज नवे वीजदर जाहीर केले आहेत. त्यानुसार २०२५-२६ या पहिल्या वर्षासाठी शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला आहे; तर १०१ युनिटहून अधिक वीज वापर असलेल्या ग्राहकांच्या वीजबिलात १ जूनपासून वाढ होणार आहे. औद्योगिक ग्राहकांच्या दरातही काहीशी वाढ होणार आहे. त्यानंतर पुढील चार वर्षे टप्प्याटप्प्याने वीजदर कमी होणार आहे. वीज आयोगाने जाहीर केलेले २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचे नवे दर १ जुलैपासून लागू होणार आहेत.

बहुवार्षिक वीजदर निश्चितीबरोबरच तीन वर्षांतील अचूक योजनेच्या पार्श्वभूमीवर वीज आयोगाने २८ मार्चला महावितरणचे वीजदर निश्चितीचे आदेश जारी केले होते. त्यानुसार आयोगाने २०२५-२६ या वर्षासाठी १० टक्क्यांची कपात तर २०२९-३०पर्यंत सुमारे १६ टक्क्यांच्या संचयी कपातीस मान्यता दिली होती. त्याला महावितरणने आव्हान देऊन वीज आयोगाकडे पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यानुसार आयोगाने आज वीजदर जाहीर केले असून त्यात पहिल्या वर्षी कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे, तर जास्तीचा वीज वापर असणाऱ्यांच्या वीजदरात वाढ होणार आहे. दरम्यान, दारिद्र्यरेषेखालील वीज ग्राहकाला पुरवल्या जाणाऱ्या विजेचा प्रतियुनिटचा दर सध्या १.७४ रुपये एवढा होता, तो आता १.४८ रुपये एवढा होणार असून तो पुढील पाच वर्षांसाठी कायम असणार आहे.
---------
घरगुती ग्राहकांचा वीजदर (प्रतियुनिटचा दर रुपयांत)
वीज वापर (युनिट) - सध्याचा दर - २०२५-२६ - २०२६-२७ - २०२७-२८ - २०२८-२९ - २०२९-३०
०-१०० - ६.३२ - ५.७४ - ५.५६ - ५.४३ - ४.५९ - ४.३४
१०१-३०० - १२.२३ - १२.५७ - १२.४० - १२.२८ - १२.१३ - १२.१५
३०१-५०० - १६.७७ - १६.८५ - १६.६४ - १६.४४ - १२.२९ - १४.६१
५०० पेक्षा जास्त - १८.९३ - १९.१५ - १९.१३ - १९.०१ - १८.३७ - १८.२०
-------------
महावितरण म्हणते, वीजदरात कपात
वीज आयोगाने महावितरणच्या याचिकेनुसार प्रथमच वीजदर कपातीचा आदेश दिला आहे. वीजदर कपातीमुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळतानाच उद्योग-व्यवसायांना चालना मिळणार असल्याचा दावा महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य घरगुती ग्राहकांच्या वीजदरात कपात करण्याचे आश्वासन दिले होते आणि त्याचे पालन झाले आहे. दरवर्षी औद्योगिक व व्यावसायिक वीजदरात दहा टक्के वाढ होत होती. त्याऐवजी आता पुढील पाच वर्षांत या घटकांच्या वीजदरात कपात होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

Palghar Bribery case: पालघरमध्ये आरोग्य अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, 35 हजार स्विकारत हाेते अन् काय घडलं!

Dharshiv Hailstorm News: लातूर-धाराशिवमध्ये गारपीटीचा कहर; शेती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; अवकाळी पावसाचा तडाखा!

Malkapur Accident: कंटेनरखाली चिरडल्याने दुचाकीस्वार ठार; मलकापूरजवळ अपघात, कंटेनरच्या वेगानं हाेत्याचं नव्हतं झालं!

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

SCROLL FOR NEXT