मुंबई

पालकमंत्रिपदाचा वाद १५ ऑगस्टपूर्वी मिटवा

CD

रोहा, ता. २९ (बातमीदार) ः रायगड जिल्‍ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. हे पद रिक्‍त असल्‍याने नियोजन समिती गठित करता येत नाही. परिणामी जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. प्रजासत्ताकदिन व महाराष्ट्रदिनही पालकमंत्र्यांविना साजरे झाले. त्यामुळे येत्या १५ ऑगस्टपर्यंत पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवावा अन्यथा तीन आमदार असलेल्या भाजपला पालकमंत्रिपदाची संधी द्यावी, अशी रोखठोक प्रतिक्रिया माजी आमदार तथा भाजपचे ज्‍येष्ठ नेते पंडित पाटील यांनी दिली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रोहा शासकीय विश्रामगृहात शनिवारी (ता. २८) रोहा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संवाद बैठक झाली. या वेळी व्यासपीठावर मुरूड तालुकाध्यक्ष शैलेश काते, माजी उपनगराध्यक्ष वसंत शेलार, नेते नितीन तेंडुलकर, तालुका सरचिटणीस कृष्णा बामणे, अल्पसंख्याक अध्यक्ष बबलू सय्यद, तालुका उपाध्यक्ष शैलेश रावकर, युवा मोर्चा सरचिटणीस रोशन चाफेकर आदी उपस्थित होते.
पाटील म्‍हणाले, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असून, गोरगरीब नागरिकांना विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ मिळत आहे. आगामी काळात दक्षिण रायगडमध्ये भाजप संघटना मजबूत करणार असल्‍याचा दावाही माजी आमदार पंडित पाटील यांनी केला आहे.

दर महिन्याला जनता दरबार
सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी रोहे शहारात दर महिन्याला जनता दरबार आयोजित करणार आहे. आगामी जिल्‍हा परिषद, पंचायत समिती व ग्रामापंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन पंडित पाटील यांनी केले आहे.

रोहा : संवाद बैठकीत माजी आमदार पंडित पाटील यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup Contamination : ...तर वाचला असता निष्पाप बालकांचा जीव; कफ सिरप कंपनीने केले ३५० बाबींचे उल्लंघन, अहवालात धक्कादायक माहिती समोर

Flight Ticket Price Hike: प्रवाशांच्या खिशाला फटका! दिवाळीपूर्वी रस्तेसह हवाई वाहतूक सेवा महागली; काय आहेत दर?

Fadanvis Interview: फडणवीस एका दिवसासाठी फिल्म दिग्दर्शक बनले तर? आवडत्या सिनेमानेच त्यांना आणलं होतं अडचणीत, म्हणाले, 'जेव्हा मी...'

Cough Syrup Ban : कफ सिरपवर केंद्राची बंदी; २ वर्षांखालील मुलांना औषध न देण्याचे कठोर निर्देश

Latest Marathi News Live Update : "माझ्यावरचा हल्ला राजकीय स्टंट!": बापूसाहेब पठारे यांचा बंडू खांदवे यांच्यावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT