मुंबई

जखमी महिला कर्मचाऱ्याची परवड

CD

तुर्भे, ता. ३० (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या सेक्टर १९ येथील रणादेवी उद्यानात झाडांच्या फांद्या गोळा करताना माळी कामगार सविता अविनाश पाटील यांच्या डोळ्याला जखम झाली. दरम्यान, त्यांच्या डोळ्यावर उपचार करण्यास नवी मुंबईतील चार दवाखान्यांनी हतबलता दाखवल्याने अखेर त्यांना मुंबईतील चेंबूर येथील दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
कोपरखैरणे सेक्टर १९ येथील रणादेवी माता उद्यानात सविता पाटील या माळी कामगार म्हणून काम करतात. शनिवारी (ता. २८) नेहमीप्रमाणे उद्यानात झाडाच्या फांद्या उचलताना सविता पाटील यांच्या डोळ्याला जबर जखम झाली. त्यांच्या डोळ्याला जखम झाल्याचे पाहताच तेथील सुरक्षा रक्षक ज्ञानेश्वर राठोड यांनी त्यांना महापालिकेच्या दवाखान्यात नेले; मात्र पाटील यांच्या डोळ्याला झालेली जखम ही गंभीर स्वरूपाची असल्याने नवी मुंबईतील चार दवाखान्यांनी उपचार करण्याबाबत हतबलता दर्शविली. त्यामुळे सुरक्षा रक्षक ज्ञानेश्वर राठोड यांनी सुनीता यांना चेंबूर येथे नेण्याचा निर्णय घेतला. चेंबूर येथील श्री कृष्ण नेत्रालय सुपरस्पेशालिटी आय केअर येथे त्यांना दाखल केले. त्यानंतर त्यांच्या डोळ्याची शस्रक्रिया करून त्यांना घरी सोडण्यात आले. शस्त्रक्रियेनंतरदेखील त्यांना डोळ्याने दिसत नसल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात जावे लागल्याचे त्यांचे पती अविनाश पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिशा सालियानची आत्महत्याच, आदित्य ठाकरेंबाबत पोलिसांनी कोर्टात दिली मोठी माहिती

Supreme Court: रस्ते अपघातात स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावला तर विमा कंपनी भरपाईस बांधील नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Viral Video: कधीही कुणाला कमी समजू नका... बेडकाने महाकाय हत्तीच्या पिल्लूला घाबरवलं, व्हिडिओ पाहा

श्री सूक्त अन् मंत्रोच्चारानं सोयाबीन उत्पादन वाढलं, गडकरींच्या पत्नीचा दावा अशास्त्रीय; अंनिसने संत ज्ञानेश्वर माऊलींचा दिला दाखला

Sachin Patil: अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा: आमदार सचिन पाटील; पिकांचे लवकर पंचनामे करुन मदत करावी

SCROLL FOR NEXT