मनोर (बातमीदार) : मनोर ग्रामपंचायत कार्यालयालगतच्या बस थांब्या लगतच्या नूतनीकरण केलेल्या सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण सोमवारी (ता. ३०) ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक शौचालयाचे मुंबईतील दलित वेल्फेअर सोसायटीमार्फत नूतनीकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीकडून शौचालय ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ (बीओटी) या तत्त्वावर दलित वेल्फेअर सोसायटीला देण्यात आले आहे. शौचालयाच्या नूतनीकरणासाठी सोसायटीकडून दहा लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या लोकार्पणप्रसंगी मनोरचे सरपंच चेतन पाटील, उपसरपंच स्वप्नाली चंपानेकर, ग्रामपंचायत सदस्य साजिद खतीब, निदा पटेल, विकास पडवळे, विनायक गोरेकर, मंगेश गोंड, अर्चना घोलप, सुरेखा कासट, हर्षला धांगडा, रेश्मा शेख, सुधीर गिरणे, ग्रामपंचायत अधिकारी नितीन पवार, दलित वेल्फेअर सोसायटीचे पदाधिकारी, रिक्षा चालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. माझी वसुंधरा अभियानअंतर्गत मनोर ग्रामपंचायतीने शौचालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.