मुंबई

पाच पुलांचे संरचनात्मक परीक्षण

CD

भाईंदर, ता. १ (बातमीदार) : इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील पाच पुलांचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी आरसीसी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात पुणे तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील ३५ वर्षे जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यात चार पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदरमधील जुन्या पुलांचे परीक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दुसरीकडे राज्य सरकारनेदेखील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हद्दीतील जुन्या पुलांचे संरचनात्मक परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चेणा नदीवरील दोन, सृष्टी, भाईंदर पूर्व व पश्चिम जोडणारा उड्डाणपूल व मिरा रोड येथील पूनम सागर परिसरातील पूल अशा पाच पुलांचे परीक्षण करण्यात येणार आहे.

चेणा नदी पावसाळ्यात पर्यटकांसाठी आकर्षण ठरते. या नदीवर आदिवासी पाड्यांकडे जाणारा एक पूल आहे, तो खूप जुना झाला आहे. नदीवर येणारे पर्यटक या पुलावरही जातात. या पुलापासून काही अंतरावर ठाणे घोडबंदर राज्य महामार्गवरही एक पूल असून, त्यालाही २० वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. या पुलावरून अवजड वाहनांची सातत्याने वर्दळ सुरू असते. हे दोन्ही पूल राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधले आहेत.

ठाणे-घोडबंदर हा रस्ता महापालिकेकडे अलीकडेच हस्तांतर झाल्याने त्यावरचा पूलही महापालिकेच्या ताब्यात आला आहे, मात्र नदीवरील जुना पूल अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेला नाही. हा पूल हस्तांतर व्हावा, यासाठी महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, या जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला महापालिकेने फलक लावले असून, त्याद्वारे पुलावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या दोन्ही पुलांचे सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षण करणे आवश्यक झाले आहे.

भाईंदर पूर्व व पश्चिम भागांना जोडणारा उड्डाणपूल गोल्डन नेस्ट चौकात बांधण्यात आला आहे. त्यालादेखील २० वर्षे उलटून गेली आहेत. काशी मिराहून भाईंदर पश्चिमेला त्याचप्रमाणे पुढे उत्तन, गोराई भागात जाणाऱ्या वाहनांसाठी हा एकमेव पूल आहे. शिवाय रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्युडिशियल अकादमी या ठिकाणी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांचीदेखील याच पुलावरून ये-जा असते. त्यामुळे हा उड्डाणपूल सर्वात जास्त वर्दळीचा बनला आहे. सृष्टी व मिरा रोडमधील पूनम सागर भागातील दोन पूलही २० वर्षांहून अधिक काळ जुने झाले आहेत. यासाठी या पाचही पुलांचे परीक्षण केले जाणार आहे.

सल्लागाराची नियुक्ती
अभिजित फातरपेकर या आरसीसी सल्लागाराची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT