मुंबई

अनधिकृत फेरीवाल्यांसोबत अधिकाऱ्यांचे साटेलोटे

CD

बदलापूर, ता. २ (बातमीदार) : बदलापुरात पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे चक्क अनधिकृत फेरीवाल्यांसोबत साटेलोटे असल्याचे समोर आले आहे. एका तक्रारदाराने अनधिकृत फेरीवाल्यांची माहिती पालिकेला दिली होती. मात्र, कारवाई करण्याऐवजी अधिकाऱ्यांनीच फेरीवाल्यांना तक्रारदाराचे नाव उघड करून नियमबाह्य काम करत आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे अतिक्रमण विभागात पारदर्शकता राहिली नसल्याचे बोलले जात आहे.

सामान्य बदलापूरकर शहरातील चौक आणि पदपथावरील अतिक्रमणाने त्रस्त होऊन अनधिकृत फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई करण्यासंदर्भात पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार करतात. त्यासंबंधी माहिती आणि पुरावा म्हणून फोटो पाठवले जातात. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई न करता अतिक्रमण विभागातील अधिकारी संबंधित अनधिकृत फेरीवाल्यांना पुरावे पाठवत आहेत. अनेक सामान्य नागरिकांनी या संदर्भात आपले नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती देतात. नियमानुसार तक्रारदाराचे नाव गुपित ठेवणे आवश्यक असते. मात्र, पालिकेचे अधिकारी नियमाचे पालन करत नाहीत. संबंधित व्यक्तीला तक्रारदाराचे नाव उघड करत आहेत. पालिकेच्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामान्य बदलापूरकरांनी केली आहे.

निलंबित अधिकाऱ्यांनाच पदोन्नती
काही वर्षांपूर्वी कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील ज्या कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कर्मचाऱ्यांवर काही वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याच कर्मचाऱ्यांना आता पालिकेतील अतिक्रमण विभागातील अधिकारी पदावर बढती मिळालेली आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आजही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

अनधिकृत फेरीवाल्यांना तक्रारदारांची माहिती पुरवली जाते, या संदर्भात पालिकेकडे तक्रार आली आहे. अतिक्रमण विभागातील जे अधिकारी अनधिकृत फेरीवाल्यांना तक्रारीची माहिती व पुरावे देत आहेत, अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- मारुती गायकवाड, मुख्याधिकारी,
कुळगाव बदलापूर नगर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT