पालघर, ता. २ (बातमीदार) : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचे अधिनस्त उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अपील प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी १२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयात भूमी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक नरेंद्र पाटील यांनी केले आहे.
भूमी लोकअदालतमध्ये जमीन मोजणी प्रकरणे, फेरफार नोंदीचे प्रकरणे, एकत्रीकरण योजनेमधील चूक दुरुस्तीची प्रकरणे व कार्यालयीन इतर तक्रारी अर्जाबाबत कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालविरोधात किंवा केलेल्या कार्यवाहीविरोधात कार्यालयात अपील प्रकरणे प्राप्त होत आहेत. अपील प्रकरणात कार्यालयाकडून सुनावणीची कार्यवाही पूर्ण होऊन निर्णय पारीत होईपर्यंत जनतेचा वेळ, पैसा व श्रम खर्ची होऊनही पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे अपील प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी भूमी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे दाखल अपील प्रकरणात दोन्ही पक्षकार स्वयंप्रेरणने अथवा विधिज्ञ यांच्यामार्फत समझोता अथवा तडजोड करण्यास तयार असल्यास त्यांनी तसा लेखी अर्ज जिल्हा अधीक्षक कार्यालयास सादर करणे गरजेचे आहे. असे अर्ज प्राप्त झाल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही होऊन दावे विनाविलंब निकाली होणार आहेत. यामुळे पक्षकारांचे आपापसातील वाद संपुष्टात येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.