मुंबई

दिड महिन्यात ५९८ झाडांवर कुऱ्हाड

CD

दीड महिन्यांत ५९८ झाडांवर कुऱ्हाड
महापालिकेकडून धोकादायक झाडांची छाटणी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : शहरातील धोकादायक झालेल्या झाडांच्या फांद्या पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली होती. यानंतर पालिका प्रशासनाने धोकादायक झाडांचा सर्व्हे करून त्या झाडांची छाटणी करण्याची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. दीड महिन्यात ५९८ धोकादायक झाडांवर पालिकेच्या उद्यान विभागाने कुऱ्हाड चालवली आहे. सर्वेक्षणाअंती रस्ते, बाजारपेठ, सोसायटी आवारातील धोकादायक झाडे, झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे.

गेल्या दीड महिन्यात कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाच्या उद्यान विभागाने १० प्रभागांतील ५९८ झाडांची छाटणी केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी धोकादायक झाडे, फांद्या काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी विविध विभागांसह उद्यान विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी शहराचा सर्व्हे केला, तसेच खासगी सोसायट्यांकडूनदेखील उद्यान विभागाकडे काही अर्ज आले होते. त्यानुसार त्यांची तपासणी करून परवानगी घेऊन ही कार्यवाही करण्यात येत आहे. १५ मे ते ३० जून या कालावधीत सुमारे ५९८ झाडांवर पालिकेने कुऱ्हाड चालवली आहे.

शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची, गटारांची कामे सुरू आहेत. या कामांमुळे काही झाडांच्या मुळांना धोका निर्माण होऊन ती झाडे पडली अथवा परवानगी घेऊन तोडून टाकण्यात आली आहेत. यंदा पावसास लवकर सुरुवात झाली असून, मे महिन्यात कल्याण पूर्वेत रिक्षावर झाड पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धोकादायक झाडांचा सर्व्हे करण्यात आला. बाजारपेठ, रहदारीचे रस्ते, स्थानक परिसर तसेच सोसायटीच्या आवारातील झाडांची पाहणी करण्यात येत आहे. धोकादायक झाडे तसेच धोकादायक फांद्या छाटण्याचे काम पालिका प्रशासनाकडून शहरात सुरू आहे. डोंबिवलीतील घनश्याम गुप्ते रोडवर पालिकेने नुकतीच झाडांची छाटणी केली आहे.

पालिकेच्या सर्वेक्षणाअंती धोकादायक झालेली झाडांची छाटणी करण्यात येत आहे. सर्व्हेमध्ये पालिका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलेली काही झाडे, नागरिकांनी मागणी केल्यानुसार काही झाडांची तपासणी करून, त्याची परवानगी घेऊन नंतर या झाडांची छाटणी करण्यात येत आहे. झाडे पडून कोणतीही हानी होऊ नये म्हणून ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे.
- संजय जाधव, मुख्य उद्यान अधिक्षक, महापालिका

१५ मे ते ३० जूनपर्यंतची कार्यवाही
प्रभाग झाडांची संख्या
अ ४५
ब ६५
क १६०
जे १०५
ड ५९
फ ३५
ह ३४
ग ४०
आय १५
ई ४०
एकूण ५९८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान खात्याकडून २ दिवस रेड अलर्ट जारी; ४८ तास धोक्याचे

Petrol and Diesel: जीएसटी रिफॉर्म लागू झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? दिवाळीनंतर काय महाग होणार?

Latest Marathi News Live Updates : अंधेरी सबवे मागील तीन तासापासून वाहतुकीसाठी बंद

"मग त्याने एकट्यानेच आर्थिक बाजू का सांभाळावी" तेजश्री प्रधानने टोचले आजच्या तरुणींचे कान, म्हणाली...

Pune News : कोथरुड पोलिसांवर आरोप करणाऱ्या तीन तरुणींसह ५ जणांवर गुन्हा दाखल, मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट....

SCROLL FOR NEXT