भूस्खलन झाल्यास काय करावे?
विद्यार्थांना एनडीआरएफचे प्रशिक्षण
घाटकोपर, ता. २ (बातमीदार) ः पावसाळ्यात मातीचे भूस्खलन होण्याचे प्रकार घडतात. अशाप्रसंगी घटनास्थळी नागरिकांनी स्वतःचा तसेच इतरांचा बचाव कसा करायचा, याबाबत एनडीआरएफ पथक मुंबईतील डोंगर भागात तसेच धोकादायक ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना प्रात्यक्षिक दाखवत शिबिर घेत आहे.
या शिबिरात एनडीआरएफचे जवान भूस्खलनदरम्यान अडकले जाणे, नाका-तोंडात माती गेल्यास ती शरीरातून बाहेर कशी काढावी, जखमी झाल्यास रुग्णाला तातडीने सोप्या पद्धतीने उचलून रुग्णालयाकडे धाव कशी घ्यावी, याबाबत घाटकोपर पश्चिमेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण देण्यात आले. विक्रोळी, पार्कसाईट वर्षानगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर उपप्राथमिक मराठी शाळा नंबर एक व दोनमधील विद्यार्थ्यांना भूस्खलन याबाबत माहिती देण्यात आली. पालिकेच्या एन प्रभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली इमारत विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल म्हैसकर, सहाय्यक अभियंता विजयकुमार वाघ, कनिष्ठ अभियंता विलास जाधव, मुकादम संतोष जाधव, अकबर शेख, नवनाथ ढोले यांच्या सहकार्यातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक कैलास भांगरे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.