अंबरनाथ, ता. २ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये एकाच आठवड्यात दोन दुचाकीस्वारांना लुटण्याचा घटना घडल्या आहेत. एकावर मिरचीपूड टाकून त्याच्याजवळून ३० हजार रुपये, तर दुसऱ्याला दुचाकीवरून पाडून डिक्कीतून तीन लाख ६५ हजार असे सुमारे चार लाखांची लूट करून आरोपी फरार झाले. यासंदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळ्या दिवशी गुन्हा दाखल झाला.
अंबरनाथ पूर्वेला पाले रोड येथील पटेल एलिजियममध्ये राहणारे लक्ष्मणदास कुकेरेजा (वय ५९) हे दारूच्या दुकानात कामाला आहेत. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घरी जात होते. मीरा वाटिका ते पाले रोडच्यामध्ये आले असताना त्यांच्या मागून दोन दुचाकीस्वार आले. या दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी कुकरेजा यांच्या कानशिलात लागावून जमिनीवर पाडले आणि दुचाकी घेऊन फरार झाले. या चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून तीन लाख ६५ हजारांची रोकड लंपास करून दुचाकी मानस अपार्टमेंट येथे सोडून दिली. अशीच एक घटना २० तारखेला रंगोळी ढाब्याजवळ घडली. शुभम कुकरेजा (वय २६) हा तरुण रात्री सव्वा अकराच्या सुमारास रंगोळी धाब्याजवळून जात असताना मागून आलेल्या दोन दुचाकीचालकांनी त्याच्यावर मिरचीपूड टाकून मारहाण केली. त्याच्याजवळून पाच हजार रोकड आणि २५ हजारांची दुचाकी चोरून फरार झाले. या दोन्ही घटना एकाच आठवड्यात घडल्याने आजूबाजूच्या परिसरात वाहनचालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.