मुंबई

पांजरपोळमध्ये जनावरांचे जंत निर्मूलन शिबिर

CD

पनवेल, ता. ३ (बातमीदार) : आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार पनवेल महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत पनवेल येथील १०० वर्षे जुन्या पांजरपोळ येथे जंतनिर्मूलन व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ७९ गायवर्गीय प्राण्यांचे जंतनिर्मूलन करण्यात आले. या शिबिरात गायींच्या जंतनिर्मूलनासोबतच आरोग्य तपासणी, उपचार, तसेच ३० गायींची गर्भतपासणी व वंध्यत्व तपासणीदेखील करण्यात आली. या वेळी गाभण, वंध्यत्वाने त्रस्त आणि दुर्बल गायींकरिता क्षार मिश्रण व कॅल्शियम टॉनिकचे मोफत वाटप करण्यात आले. उपायुक्त डॉ. वैभव विधाते व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या सूचनेप्रमाणे घेण्यात आलेल्या या शिबिरासाठी पशुवैद्यकीय विभागातील तज्ज्ञ अधिकारी डॉ. भगवान गिते, डॉ. मधुलिका लाड, पांजरपोळचे उपाध्यक्ष नितीन मुनोत, डॉ. लाजरी पावसकर, डॉ. राधिका आव्हाड, तसेच पशुसंवर्धन विभागाचे डॉ. समीर तोडणकर, डॉ. मुकेश मर्चंडे, डॉ. आनंद मारकवार आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT