मुंबई

१५ दिवसांत १२४ बेकायदा बांधकामांवर हातोडा

CD

१५ दिवसांत १२४ बेकायदा बांधकामांवर हातोडा
शिळ येथील १८ अनधिकृत इमारती भुईसपाट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक कामाला लागले आहे. शहरात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. १९ जूनपासून सुरू झालेल्या या मोहिमेत अवघ्या १५ दिवसांत १२४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. यामध्ये शिळच्या खान कम्पाउंड येथील १८ इमारतीही भुईसपाट केल्या आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा नवीन नाही. यावर अनेक आर्थिक गणिते अवलंबून असल्याने राजकारणी आणि पालिका अधिकाऱ्यांचे हातही यात गुंतले आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच पालिका क्षेत्रात शेकडो अनधिकृत बांधकामे उभी राहिली; पण शिळ येथील खान कम्पाउंड परिसरातील भूखंडाचा वाद उच्च न्यायालयात गेला आणि पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्तांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.

इतकेच नव्हे तर न्यायालयाने यासाठी स्वतंत्र समिती नेमून त्यांच्या देखरेखीखाली पालिका हद्दीतील सर्व अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन तत्काळ कारवाईचे आदेश दिले. न्यायालयाचा हातोडा पडताच आता पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथकही कामाला लागले आहे. शिळ येथील एम. के. कम्पाउंड येथे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण २१ इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे. सुरुवातीला येथे १७ अनधिकृत इमारती असल्याची माहिती मिळाली; पण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ही संख्या २१ असल्याचे निदर्शनास येताच सर्व इमारती पाडण्याचे काम सुरू झाले आहे. या कारवाईत रहिवाशांचा विरोध झुंगारून आतापर्यंत १८ इमारती पाडण्यात आल्या आहेत. उर्वरित इमारतींच्या निष्कासनाची कारवाई परिमंडळ उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, सचिन सांगळे यांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे. तसेच या मोहिमेची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरूपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत.

कारवाईचा भर वाढीव बांधकामांवर
प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य देण्यात आले आहे; मात्र या मोहिमेत आरसीसी इमारतींपेक्षा वाढीव बांधकामांवरच कारवाईचा बडगा उभारला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या कारवाईत अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, आरसीसी इमारतीचे बांधकाम, अनधिकृत बंगले, नाल्यालगतचे बांधकाम, आरक्षित भूखंडावरील गोदामांचे बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई केली आहे. हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेत त्यावरही कारवाई सुरू आहे. तसेच खाडीकिनारा, अनधिकृत भरणी यावरही कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली.


प्रभागनुसार कारवाई
नौपाडा-कोपरी - १०
दिवा - २८
मुंब्रा - १५
कळवा - १२
उथळसर - ११
माजिवडा-मानपाडा - २०
वर्तकनगर - १४
लोकमान्यनगर - १०
वागळे इस्टेट - ०४
एकूण - १२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT