नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : एपीएमसीमधील एकतानगर झोपडपट्टीमध्ये गांजाची विक्री करणाऱ्याला एपीएमसी पोलिसांनी बुधवारी (ता. २) रात्री अटक केली. अर्षद याकूब शेख (३६) असे त्याचे नाव असून त्याच्याजवळ सापडलेला ४० हजारांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अयज शिंदे यांनी आपल्या हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शेलार व त्यांच्या पथकाने बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एपीएमसीच्या हद्दीत पेट्रोलिंगला सुरुवात केली होती. पोलिसांचे पथक रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास एपीएमसीमधील एकता नगर झोपडपट्टीजवळ आले असता, तेथील रस्त्यावर अर्षद याकूब शेख हा काळ्या रंगाची प्लॅस्टिक पिशवी घेऊन उभा असल्याचे, तसेच त्याच्याकडे जाणाऱ्यांना तो पैसे घेऊन काहीतरी देत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याजवळ असलेल्या पिशवीची तपासणी केली असता, त्याच्या पिशवीमध्ये एक किलो ६७० ग्रॅम वजनाचा ४० हजारांचा गांजा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी गांजा जप्त करून अर्षद शेखच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.