ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी
खड्ड्यांमुळे प्रवास मंदावला; वाहनचालक त्रस्त
तुर्भे, ता. ३ (बातमीदार) ः मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील उड्डाणपुलांसह वाहतुकीच्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे सकाळ व सायंकाळी कोंडीमध्ये अधिकच भर पडत असल्याने त्यावर तोडगा काढण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
ठाणे-बेलापूर मार्ग हा नवी मुंबईतील वाहतुकीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. ठाण्यातून पुणे, कोकणकडे जाणाऱ्या गाड्यांना हा मार्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मार्गावर हजारो वाहनांची दररोज ये-जा सुरू असते. शिवाय जेएनपीए जवळच असल्याने सर्वसामान्य वाहनांबरोबर अनेक अवजड वाहनांची या ठिकाणी वर्दळ असते. तसेच या मार्गावर झोपडपट्टी तसेच एमआयडीसी परिसर असल्याने अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे. तर काही उड्डाणपुलांची रखडपट्टी झाली असून या कामासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे चारपदरी मार्गावरील दोनपदरी रस्ता अडवला गेला असल्याने वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. या मार्गावर एमआयडीसी, आयटी कंपन्या असल्याने सकाळ व सायंकाळी मोठ्या प्रमाणात या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. तुर्भे नाक्यापासून ते पावणे गावापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. त्यामुळे वाहतूकदारांचा वेळ, इंधन वाया जात आहे. त्यामुळे हे अर्धवट अवस्थेत असलेले काम पूर्ण करून घ्यावे आणि हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
....................
कोट
ऐरोली-मुलुंड उड्डाणपुलावर पडलेले खड्डे बुजविले जात आहेत. तसेच रिलायन्ससमोरील पुलावरदेखील पालिका प्रशासनाकडून खड्डे बुजविले जात आहेत. तसेच तुर्भेमध्ये ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत तेदेखील बुजविण्यात येणार आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. कमीत कमी वेळात वाहतूक कोंडी कमी केली जाईल.
-तिरुपती काकडे, डीसीपी, वाहतूक विभाग
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.