मुंबई

शाळा बाह्य बालकांचा घेणार शोध

CD

शाळा बाह्य बालकांचा घेणार शोध
१ जुलै ते १५ जुलै या कालावधीत राबविणार मोहीम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील वीटभट्टीवर मजुरीसाठी स्थलांतरीत होणाऱ्या कुटुंबियांतील यासह विविध कारणांनी शिक्षांपासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांसाठी शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्या संदर्भातील बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून त्यांनी संबंधी विभागांना निर्देश दिले आहेत.
केंद्र आणि राज्यशासन नियमित शिक्षणाकडे लक्ष वेधले असून बालके शाळाबाह्य होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रोजगारासाठी जिल्ह्यातून हंगामी वास्तव्यास कुटूंबाच्या कुटूंबे येत असतात. या कुटूबांमध्ये शाळकरी मुलांचा मोठ्या प्रमाणत समावेश असतो. मात्र, या स्थलांतरामुळे कुटूंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहवे लागते. यामध्ये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. शाळेत कधीही दाखल न झालेली तसेच शाळेत जाणारी बालके, ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा ज्या बालकांनी प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नसेल अशा ६ ते १४ वयोगटातील बालके एक महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित राहत असतील तर असे शाळाबाह्य बालक असल्याचे दिसून येत असते. याची दखल घेत, शासनाच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी व त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ही मोहीम जिल्ह्यातील सहा महापलिका आणि पाच तालुक्यात राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील एक बैठक नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत त्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले.

शाळाबाह्य बालकांमध्ये मुलांचे प्रमाण अधिक
ठाणे जिल्ह्यातील विविध भागात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याची मोहीम मागील वर्षी राबविण्यात आली. या मोहिमेत ५७८ शाळाबाह्य मुले आढळून आली. यामध्ये शाळाबाह्य बालकांमध्ये मुलांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये सर्वाधिक ३२१ मुलांचा तर, २५७ मुलींचा समावेश आहे. या सर्व बालकांना शाळेत प्रवेश देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravichandran Ashwin IPL Retirement : रविचंद्रन अश्विनचा IPL ला देखील रामराम! 8 महिन्यात घेतला दुसरा मोठा निर्णय

Lasalgaon News : श्रीलंकेने कांद्यावरील आयात शुल्क वाढवले; भारतीय कांदा निर्यातदारांना फटका

Pune News : पुण्यात गणेशोत्सव काळात मद्यविक्रीस बंदी; कायदा सुव्यवस्थेसाठी निर्णय

Ganpatipule Travel: गणेशोत्सवात गणपतीपुळेच्या दर्शनासाठी जाताय? या जवळच्या ठिकाणांना देखील भेट द्या!

Raigad News: परंपरेचा व तंत्रज्ञानाचा सुरेख संगम; बाप्पाच्या दर्शनाचे डिजिटल आग्रहाचे आमंत्रण, डिजिटल बॅनर व व्हिडिओद्वारे आमंत्रणाचा ट्रेंड

SCROLL FOR NEXT