संगीतमय सीताचरित्राचे आयाेजन
३० कला प्रकारांसह ५१३ कलाकारांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : ‘सीता चरित्रम’ नावाची संगीतनाट्य कलाकृती नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात रविवारी (ता. ६) मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. रामायणातील सीतेचे सामर्थ्य, शहाणपण आणि शाश्वत प्रतिष्ठेचा दृष्टिकोन या संगीतनाट्यातून नव्याने उलगडणार आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका श्रीविद्या वर्चस्वी यांच्या कल्पनेतून ही दृश्यात्मक महाकृती साकारली आहे.
श्री श्री रविशंकर यांच्या आध्यात्मिक अंतर्दृष्टीवर हे संगीतनाट्य आधारीत असून हे नाट्य केवळ सौंदर्यदृष्ट्या समृद्ध नसून मानवी मनाला प्रेरणा देते, मनोबल वाढवून अंतर्मनाला स्पर्श करते. यामध्ये ३० हून अधिक भारतीय कला प्रकार, डिजिटल प्रोजेक्शन, बाहुल्यांची नाटिका, शास्त्रीय आणि लोकनृत्य यांच्या समावेश असलेली एक दृश्यात्मक महाकृती असणार आहे. या संगीत नाट्यात ५१३ कलाकार सहभागी झाले असून त्यात धारावीतील ५० हून अधिक बालकलाकारांचा समावेश आहे.
सीतेच्या प्रवासात एक खोल अंतर्बोध आहे, सितेचे सौंदर्य, ताकद, तिचे प्रेम या नाट्यातून अनुभवायला मिळेल, असे श्रीविद्या यांनी सांगितले. श्रीविद्या यांनी आतंरराष्ट्रीय स्तरावर काम केले असून त्यांनी लिंकन सेंटरमध्ये द रिदम विथीन आणि वर्ल्ड कल्चरल फेस्टिव्हलमध्ये सात एकरावर असलेल्या स्टेजवर ४,६०० कलाकारांना सोबत घेऊन ‘दी कोस्मेरी रिदम’ हा प्रयोग केला होता.
यातून मिळणारे उत्पन्न आर्ट ऑफ लिव्हिंगच्या १,३२७ विनामूल्य शाळांमधील आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.