मुंबई

जय गुजरात म्हणणारे शिंदे गुजरातचे गुलाम - हर्षवर्धन सपकाळ

CD

‘जय गुजरात’ म्हणणारे गुजरातचे गुलाम!
हर्षवर्धन सपकाळ यांची शिंदेंवर टीका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : ‘महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाचा प्रदेश आहे. स्वराज्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती; पण आज छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकनाथ शिंदेंसारख्या गुलामांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. ते गुजरात आणि अमित शहांचे गुलाम आहेत. सत्तेसाठी लाचार झालेला माणूसच महाराष्ट्रातील कार्यक्रमात ‘जय गुजरात’ची घोषणा देऊ शकतो. स्वाभिमानी मराठी माणूस हे कदापि सहन करणार नाही,’ अशी टीका आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
‘बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून पक्ष व चिन्ह गुजरातच्या मालकाने शिंदेंना दिले आणि मुख्यमंत्रिपदी बसवले. त्या शिंदेंच्या तोंडून मोदी-शाह स्तुती करणे समजू शकतो; पण आपल्या गुजराती मालकाला खूश करण्यासाठी चक्क ‘जय गुजरात’ म्हणावे एवढी लाचारी बरी नव्हे! अमित शाह यांचा ‘वफादार’ शिलेदार होण्याच्या नादात एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राची मान शरमेने खाली घातली. महाराष्ट्राच्या सत्तेत एकापेक्षा एक नमुने बसलेत, हे पुन्हा एकदा दिसले. एकनाथ शिंदे गुजरातचे नाही, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत याचा त्यांना विसर पडला का,’ असा सवाल करीत महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT