मुंबई

मुलीला नोकरी न मिळाल्याने विषप्राशन

CD

मुलीला नोकरी न मिळाल्याने विषप्राशन
वडिलांचा मृत्यू; आईवर रुग्णालयात उपचार सुरू
मुरबाड ता. ४ (बातमीदार) : बारवी प्रकल्पपीडित म्हणून मुलीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी न मिळाल्याने निराश झालेल्या आई़-वडिलांनी गुरुवारी (ता. ३) कीटकनाशक प्राशन केले. यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला असून, मुलीची आई मध्यवर्ती रुग्णालय, उल्हासनगर येथे उपचार घेत आहे.
मुरबाडजवळील सुकाळवाडी येथील मंगल गोमा उघडा (वय ४३) व संगीता उघडा (वय ३९) यांनी गुरुवारी कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात मंगल उघडा हे उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात मरण पावले, तर संगीता मंगल उघडा यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बारवी प्रकल्पपीडित मंगल उघडा यांचा मुलगा करण उघडा हा प्रकल्पपीडित म्हणून नवी मुंबई महापालिकेत नोकरी करीत होता. ८ मार्च २०२५ रोजी त्याचे निधन झाले. त्याच्या जागेवर मुलगी कल्पना उघडा हिला नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी मंगल याने जिल्हाधिकारी ठाणे व एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता यांना अर्जाद्वारे केली होती. नोकरी न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी अर्जात म्हटले होते.
दरम्यान, मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी २५ मे २०२५ रोजी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन या पीडित कुटुंबातील सदस्य नोकरीत सामावून घेण्याविषयी शिफारस केली होती; मात्र या आदिवासी कुटुंबातील मुलीला नोकरी मिळाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा, तणाव वाढला!

Nagpur Bench Verdict : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांनाही समान हक्क; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Indian crew killed in Hormuz attack : इराणचा होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजावर हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू तर एक बेपत्ता

T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ

Sangola Political: सांगोला तालुक्यात राजकीय भूकंप! साळुंखे-पाटलांचे पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक..

SCROLL FOR NEXT