खारघरमध्ये एका तासात घरफोडीच्या पाच घटना
खारघर, ता. ४ (बातमीदार) : सेक्टर १६ वास्तुविहार गृहसंकुलामधील संस्कृती सोसायटीतील बंद असलेल्या पाच घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या. या घटना गुरुवारी (ता. ३) रात्री घडल्या. चोरांच्या हाती धारदार शस्त्रे असल्याचे सीसीटीव्हीत निदर्शनास येत असल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खारघर सेक्टर १६ वास्तुविहार गृहसंकुल तीन महिन्यांपूर्वी उत्सव सोसायटीमधील चार घरांत चोरी झाल्याची घटना ताजी असताना गुरुवारी रात्री तीन ते चार चोरट्यांनी संस्कृती सोसायटीत प्रवेश करून बंद असलेल्या पाच घरांचे कडीकोयंडा तोडून रोख रक्कम आणि ऐवज लंपास केला. ही घटना येथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून भाजपचे पदाधिकारी समीर कदम यांनी परिसरात पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.