मुंबई

धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडले

CD

धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडले
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कासा, ता. ४ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी धरणातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरण प्रशासनाने शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी ६ वाजता धरणाचे तीन दरवाजे उघडले. ४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता धामणी धरणातील पाण्याची पातळी शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ११४.०० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, जलसाठा २१४.९१९ दलघमी (दशलक्ष घन मीटर) म्हणजेच सुमारे ७७.७७ टक्के इतका आहे. सध्याच्या पावसाळी परिस्थितीनुसार, पाण्याची पातळी ११४.६० मीटरपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचदरम्यान पाण्याची पातळी ११३.६० मीटरवर स्थिर ठेवण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास धरण प्रशासनाने धरणाचे तीन वक्राकार दरवाजे १, ३ व ५ हे प्रत्येकी ०.४० मीटर उंचीपर्यंत उघडले. यामुळे सुमारे ३,२८५ क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे. सोबतच विद्युतगृहातून ६५० क्युसेक पाणी विसर्ग केले जाणार असून, एकूण पाणी विसर्ग ३,९३५ क्युसेकपर्यंत होणार आहे. परिणामी सूर्या नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीय वाढणार आहे. अतिवृष्टीमुळे धरण प्रशासन सावध असून, पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गाचे प्रमाण कमी किंवा अधिक करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सूर्या नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणी विसर्गादरम्यान नदीकाठच्या लोकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, नदीकाठी जाणे टाळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT