मुंबई

गोळीबारात जखमी झालेल्या अल्ताफ शेख यांचा गौप्यस्फोट!

CD

जखमी अल्ताफ शेख यांचा गौप्यस्फोट!
गोळीबाराचा सूत्रधार शिवसेनेचा उप शहरप्रमुख
बदलापूर, ता. ४ (बातमीदार) : बदलापुरात गुरुवारी (ता. ४) भाजप आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोर दुपारी झालेल्या गोळीबारात जखमी अल्ताफ शेख यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांनी एका व्हायरल व्हिडिओमार्फत गौप्यस्फोट केला आहे. या हल्ल्यामागील सूत्रधार म्हणून त्यांनी शिंदे गटाचे उप शहरप्रमुख जगदीश कुडेकर यांचे नाव उघड केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अल्ताफ शेख याने हा गोळीबार शिवसेना शिंदे गटाचा उप शहरप्रमुख जगदीश कुडेकर यांच्या सांगण्यावरून केला, असा थेट आरोप गोळीबारात जखमी झालेल्या अल्ताफ शेख याने केला आहे. शिवाय माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचेही त्याने सांगितले आहे. याआधी जगदीशने माझं दुकान जाळून टाकले होते. यासंदर्भाची तक्रार मी पोलिसांना केली; मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच माझ्यावर हा जीवघेणा हल्ला झाल्याचे अल्ताफ यांनी स्पष्ट केले.
अल्ताफने पोलिसांना दिलेल्या जबाबात शिवसेना उप शहरप्रमुख जगदीश कुडेकर हा या गोळीबाराचा सूत्रधार असल्याचे सांगितले; मात्र पोलिसांनी एफआयआरमध्ये जगदीशचे नाव घेतले नसल्याचा आरोप अल्ताफ यांनी केला. जगदीश कुडेकर हा शिवसेना शिंदे गटाचा उप शहरप्रमुख असल्याने राजकीय दबावापोटी पोलिस असे काम करीत असल्याचा खळबळजनक आरोप अल्ताफकडून करण्यात आला आहे.

मी ही घटना घडली त्या वेळी माझ्या वैयक्तिक कामासाठी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात होतो. माझे अल्ताफ शेख याच्यासोबत किरकोळ वाद होते. काल त्याच्यावर जो हल्ला झाला त्यातील एक आरोपी हा माझ्याकडे नोकरीला आहे; पण नोकरीनंतर कोण काय करते, त्याची जबाबदारी माझी नाही. त्यामुळे हे आरोप बिनबुडाचे आहेत. सगळ्या घटनेची चौकशी पोलिस करीत असून, सत्य काय ते समोर येईलच.
- जगदीश कुडेकर, उप शहरप्रमुख, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT