मुंबई

बोगस डॉक्‍टरांची होणार कारवाई

CD

बोगस डॉक्‍टरांची होणार कारवाई
पनवेल आयुक्‍तांच्या आदेशानंतर महापालिकेकडून मोहीम तीव्र

पनवेल, ता. ५ (बातमीदार)ः महापालिका क्षेत्रात अनेक बोगस डॉक्‍टर दवाखाने उघडून बसले आहेत. नागरिकांच्या आरोग्‍याशी खेळणाऱ्या डॉक्‍टर्सविरोधात मोहीम तीव्र केली आहे. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सूचनेनुसार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली कामोठेतील समाज केंद्रात नुकतीच एका बैठक आयोजित करण्यात आली. बोगस डॉक्टरांची वाढती संख्या आरोग्य व्यवस्थेसाठी धोकादायक ठरत असल्याने, पनवेल महापालिका आता सतर्क झाली असून, शोधमोहीम सुरू केली आहे.
शहरातील अनेक भागांत शैक्षणिक पात्रता व वैद्यकीय परवाना नसताना काहीजण नागरिकांवर उपचार करत असल्याची माहिती महापालिकेकडे आली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी आरोग्य विभाग व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संयुक्त मोहीम राबवण्याचे आदेश दिले. बैठकीस पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, पनवेल येथील खासगी वैद्यकीय व्यावसायिक संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते. या वेळी बोगस डॉक्टरचा शोध घेणे, कारवाई करणे याविषयी सरकारच्या आरोग्यसेवा आयुक्तालय कार्यालयाकडून आलेले सूचनेसंबंधी माहिती देण्यात आली.
बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याकरिता पनवेल पालिका स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष आयुक्त तर सचिव म्हणून वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. पालिका स्तरावरील समिती अंतर्गत प्रभागनिहाय क्षेत्रीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रभाग अधिकारी, मुख्य स्वच्छता निरीक्षक अणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती त्या त्या क्षेत्रातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या दवाखान्यात भेटी देऊन, वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रमाणपत्राची तपासणी करणार आहेत. तपासणीचा अहवाल पालिका स्तरावरील समितीकडे पाठवणार आहेत.
महापालिका स्तरावरील समितीकडे बोगस डॉक्टर आढळल्‍यास, क्षेत्रिय समिती संबंधित बोगस डॉक्टरवर गुन्हा नोंद करणार आहे. सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना योग्य माहिती देण्यात यावी, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे. बैठकीस पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पंडित अणि डॉ. मनीषा चांडक व स्वछता निरीक्षक योगेश कस्तुरे उपस्थित होते.

चौकट
शासन निर्णय
बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधून काढण्यासाठी शासन निर्णयअन्वये जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय तसेच नगरपालिका व महापालिकास्तरीय समित्या स्थापन करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समित्यांकडून सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या दवाखान्यात भेटी देण्यात येणार आहे. वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रमाणपत्राची तपासणी करून, अहवाल पालिका स्तरावरील समितीकडे पाठवण्याबाबत आदेश दिले आहेत.


बोगस डॉक्टरांकडून उपचार घेतल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. अशा प्रवृत्तीला पनवेलमध्ये थारा नाही. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा डॉक्टरांपासून सावध राहावे आणि कोणतीही शंका असल्यास थेट महापालिकेला माहिती द्यावी.
- वैभव विधाते, उपायुक्त, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT