मुंबई

प्लास्टिक मुक्तीसाठी पनवेल महापालिकेची पावले

CD

प्लास्टिकमुक्तीसाठी पनवेल महापालिकेची पावले
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिनानिमित्त पुनर्वापरयोग्य कचरा संकलन केंद्राचे उद्घाटन

पनवेल, ता. ६ (बातमीदार)ः स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात पुनर्वापरयोग्य कचरा संकलन केंद्र उभारणीचा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. कचरा वर्गीकरण, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शहरातील तीन सोसायट्यांमध्ये पुनर्वापरयोग्य प्लास्टिक व ई-कचरा संकलन केंद्र सुरू करण्यात आले.
मिलन सोसायटी, नीलवर्धमान सोसायटी, मेलडी टॉवर या तीन ठिकाणी सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांच्या हस्ते ई-कचरा संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पुढील काळात महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी याच पद्धतीने पुनर्वापर प्लास्टिक व ई-कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. नागरिकांनी प्लॅस्टिक कचरा, ई-कचरा इतरत्र न टाकता महापालिकेच्या केंद्रांमध्ये जमा करावा, असे आवाहन घनकचरा व स्वच्छता विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी केले आहे.

हा कचरा टाकावा
पुनर्वापरयोग्य प्लॅस्टिक व ई-कचरा संकलन केंद्रांमध्ये संकलित करण्यात येणाऱ्या वस्तू प्लॅस्टिक कचरा, ई-कचरा, प्लॅस्टिक कचरा : बाटल्या, पिशव्या, कंटेनर, पॅकेजिंग साहित्य, तुटलेली प्लॅस्टिक उत्पादने, ई-कचरा : मोबाईल फोन, चार्जर, केबली, बॅटरी, इयरफोन, रिमोट, बल्ब, लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणे.


हा टाकू नये
ओला कचरा, वैद्यकीय कचरा, काच व धातूची वस्तू, मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, घातक कचरा

कोट
प्लॅस्टिकमुक्त शहर घडवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग गरजेचा आहे. पुनर्वापरयोग्य कचरा संकलन केंद्रांमुळे प्लॅस्टिकच्या पुनर्वापराला चालना मिळेल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल.
- श्रीराम पवार,
आयुक्त, पनवेल महापालिका

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT