सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ठाणे पालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पाचपाखाडी, गणेशवाडी या ठिकाणी एक झाड रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन चारचाकी वाहनांवर पडल्याची घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. हे झाड रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. आपत्ती व्यवस्थापनाने हे झाड कापून बाजूला केल्यावर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. घटनेत वाहनांचे नुकसान झाले असून, कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
पाचपाखाडी गणेशवाडीत वाहनांवर झाड पडल्याची माहिती कुणाल सकपाळ यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नौपाडा पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, उथळसर आणि वर्तकनगर प्रभाग समितीनिहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली. जगदीश सायरिया, सिद्धीत सिंगल आणि नरसिंगराव चव्हाण यांच्या मालकीच्या गाड्यांवर झाड पडून नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने झाड कापून बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.