मुंबई

३७ लाखांच्या गांजासह तिघांना अटक

CD

भिवंडी, ता. ५ (वार्ताहर)ः शहरात विक्रीसाठी आणलेला ३७ लाखांचा ७४ किलो गांजा भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी भिवंडीतील दोघांसह कल्याणमधील एकाला अटक केली आहे.
भिवंडीतील अन्वर अन्सारी याच्या घरी फैजल अन्सारी अब्दुल अन्सारीला गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचत फैजल अन्सारी (४४ रा. कल्याण), अब्दुल अन्सारी (२०), अन्वर अन्सारी (३४ दोघे रा. भिवंडी) यांना अटक केली. घराच्या पडवीमध्ये ३७ लाख ३७ हजार ४०० रुपयांच्या किमतीचा ७४ किलो ५४८ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला आहे. याप्रकरणी स्थानिक भोईवाडा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, भिवंडी गुन्हे शाखेने मे महिन्यात रांजनोली ब्रिजखाली गांजा तस्करांवर कारवाई करत दोघांकडून ११ लाख ५४ हजार रुपये किमतीचा ४१.१०० किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून दोघांनाही अटक केली होती.
------------------------------------------------
मोलाची कामगिरी
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज केदार, श्रीराज माळी, रवींद्र पाटील, सुधाकर चौधरी, सुदेश घाग, प्रकाश पाटील, राजेश गावडे, नीलेश बोरसे, अनुष्का पाटील, अमोल इंगळे, भावेश घरत, रवींद्र साळुंखे पथकात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT