सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ठाणे पालिका क्षेत्रात कचऱ्याचा प्रश्न आ वासून उभा ठाकलेला आहे. तर दुसरीकडे ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडी आतकोली येथील १५ एकर जागेत ५०० टन प्रती दिन क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, पीपीपी तत्त्वावर २० वर्षांसाठी तो असणार आहे.
ठाणे पालिका क्षेत्रात काही दिवसांपासून कचऱ्याचा प्रश्न जटील होत चालला आहे. पालिका हद्दीत रोजच्या रोज सुमारे चार लाख नागरिक बाहेरून ये-जा करत आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात दरडोई सुमारे ५०० ग्रॅम कचऱ्याची निर्मिती होत आहे. त्यानुसार महापालिका हद्दीत रोज सुमारे १२०० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. त्यात साधारणपणे ५० टक्के ओल्या कचऱ्याचा समावेश आहे. सद्यस्थितीत ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी विकेंद्रीत पद्धतीने महापालिका हद्दीत प्रत्येकी पाच टन क्षमतेचे विविध तंत्रज्ञानावर आधारीत १६ प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्याद्वारे सुमारे ८० मेट्रिक टन ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. गायमुख परिसरात १९४ टन क्षमतेचे विकेंद्रीत पद्धतीने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सोलराईज्ड मॅकेनिकल कम्पोस्टिंग प्रकल्प आणि मोबाइल कम्पोस्टिंग व्हॅन प्रस्तावित आहेत. भविष्यात वाढती लोकसंख्या विचारात घेता कचऱ्याच्या प्रमाणातही वाढ होणार आहे. त्यानुसार निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया गरजेचे असल्याने महापालिकेने ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले आहे.
सध्या ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात निर्माण होणारा कचरा हा भिवंडी येथील आतकोली येथील ३२ हेक्टर जागेत टाकला जात आहे. त्या ठिकाणी आता १५ एकर जमिनीवर तब्बल ५०० टन प्रती दिन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजूर करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.